Nokia येत्या 11 जूनला ‘सी-सीरीज’ अंतगर्त स्वस्त स्मार्टफोन Nokia C20 Plus लाँच करणार आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. परंतु, आज नोकिया सी20 प्लस बाजारात घेऊन येण्याआधी कंपनीने कमी किंमत असलेला मोबाईल फोन Nokia C01 Plus लाँच केला आहे.
Nokia C01 Plus ची किंमत
नोकियाने आपला हा नवीन स्मार्टफोन RUB 6,490 मध्ये रशियातील बाजारात लाँच केला आहे. हि किंमत भारतीय चलनात 6,550 रुपयांच्या आसपास आहे. Nokia C01 Plus रशियन मार्केटमध्ये Purple आणि Blue रंगात लाँच केला गेला आहे. हा फोन भारतात कधी लाँच होईल, याची माहिती अजूनतरी समोर आली नाही.
Nokia C01 Plus चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
नोकिया सी01 प्लस कंपनीने 18:9 अस्पेक्ट रेशियोसह सादर केला गेला आहे. हा फोन 720 X 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 5.45 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने Nokia C01 Plus अँड्रॉइड 11 ओएससह लाँच केला आहे, फोनमध्ये Android 11 Go Edition देण्यात आले आहे.
या फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी Unisoc SC9863A चिपसेट देण्यात आला आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन 1 जीबी रॅमसह 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हि स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येते. हा फोन ड्युअल सिम सपोर्टसह बाजारात आला आहे.
Nokia C01 Plus च्या बॅक पॅनलवर फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी देखील 5 मेगापिक्सलचाच फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळतो. 3.5एमएम जॅक सोबत सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया सी01 प्लसमध्ये 3,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.