Nokia आपल्या सी सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन्स लाँच करण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या Nokia C20 Plus नंतर आता Nokia C30 बाजारात दाखल केला जाऊ शकतो. कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही, परंतु या फोनच्या लीक्स बघून वाटत आहे कि, कंपनी लवकरच या फोनच्या लाँच डेट सांगू शकते. (Nokia C30 with Full-HD display, single rear camera may be in works)
गेल्याच महिन्यात नोकिया सी30 फेडरल कम्युनिकेशन्स कमीशन (FCC) च्या लिस्टिंगमध्ये दिसला होता. आता नोकिया सी30 चे लीक फोटोज समोर आले आहेत. या लीकमधून समजले आहे कि या या फोनमध्ये वाटरड्रॉप नॉच असेल. फोनमध्ये वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल आणि फिंगरप्रिंट सेन्सर मागच्या बाजूला देण्यात येईल.
Nokia C30 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटच्या लिस्टिंगवरून समजले आहे कि, नोकिया सी30 मध्ये 6.82 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात येईल. हा फुलएचडी+ डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. या फोनमध्ये 1.6 गीगाहर्ट्ज हेक्सा-कोर चिपसेट दिला जाऊ शकतो. हा अँड्रॉइड 11 आधारित स्मार्टफोन 3 जीबी रॅम व 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो.
फोटोग्राफीसाठी नोकिया सी30 मध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात येईल. तसेच हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. नोकिया सी30 मध्ये 6000mAh ची मोठी मिळू शकते.