नोकियानेनं काल भारतात आपला प्रोडक्टसचा पेटारा उघडला होता. कंपनीनं एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन-Nokia G21, दोन फिचर फोन्स- Nokia 105 आणि Nokia 105 Plus सादर केले आहेत. त्याचबरोबर Nokia Comfort Earbuds आणि Nokia Go Earbuds+ हे दोन नवीन इयरबड्स देखील भारतीयांच्या भेटीला आले आहेत.
Nokia Comfort Earbuds
नोकिया कंफर्ट इयरबड्समध्ये 10mm च्या ड्रायव्हर्सचा वापर करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ v5.1 मिळतं. यात एनवायरनमेंट नॉइज कॅन्सलेशन (ENC) फिचर देण्यात आला आहे. कंफर्ट इयरबड्समध्ये वॉटर रेजिस्टन्स बिल्ट देण्यात आली आहे. इयरबड्समध्ये 60mAh ची बॅटरी मिळते तर चार्जिंग केसमध्ये 330mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. इयरबड्स सिंगलचार्जमध्ये 9.5 तास वापरता येतात. तर चार्जिंग केसमुळे 29 तासांपर्यंतचा प्ले बॅक टाइम मिळतो.
Nokia Go Earbuds+
Nokia Go Earbuds+ मध्ये 13mm ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. तसेच ब्लूटूथ v5.0 ची कनेक्टिव्हिटी मिळते. या इयरबड्समध्ये स्प्लॅश रेजिस्टन्स बॉडी देण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये हे 26 तासांचा प्लेबॅक टाइम देतात, असा दावा कंपनीनं केला आहे. यात ईयरबड 6.5 तास वापरता येतात. परंतु चार्जिंग केसमुळे बॅकअप वाढतो. ही चार्जिंग केस यूएसबी टाइप-सी पोर्टनं चार्ज करता येते.
किंमत
Nokia Comfort इयरबड्सची किंमत 2,799 रुपये आहे. तर Nokia Go Earbuds+ ची किंमत 1,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे इयरबड्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म्ससह ऑफलाईन रिटेल स्टोर्समधून देखील विकत घेता येतील. कंपनीनं या इयरबड्सचे ब्लॅक आणि व्हाईट असे दोन कलर ऑप्शन सादर केले आहेत.