Nokia E3103 TWS इयरबड्स कोणताही गाजावाजा न करता लाँच करण्यात आले आहेत. या इयरबड्समध्ये IPx4 वॉटर रेजिस्टन्स, Bluetooth 5.1 कनेक्टिव्हिटी, 13mm ड्रायव्हर आणि व्हॉइस असिस्टंट सपोर्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. या इयरबड्सचे तीन कलर व्हेरिएंट सादर केले आहेत. परंतु अजूनही नोकियानं या इयरबड्सच्या किंमतीची माहिती दिली नाही. तसेच ये बड्स कधीपासून खरेदी करता येतील हे देखील सांगितलं नाही.
Nokia E3103 TWS Earbuds चे स्पेसीफिकेशन
Nokia E3103 TWS इयरबड्सची डिजाइन E3101 TWS इयरबड्ससारखी, परंतु स्पेसिफिकेशन अपग्रेड करण्यात आले आहेत, अशी माहिती टेक वेबसाईट Gizmochina च्या रिपोर्टमधून मिळाली आहे. नोकिया E3103 ट्रू वायरलेस इयरबड्समध्ये सिलिकॉम ईयरटिप मिळत नाही. एका ईयरबडचे वजन 3.3 ग्राम आहे. तसेच हे इयरबड्स व्हाईट, पिंक आणि ब्लॅक अशा तीन कलर व्हेरिएंटमध्ये विकत घेता येतील.
या बड्सची सर्वात मोठी खासियत म्हणजे यातील 32 तासांचा बॅटरी बॅकअप. यासाठी प्रत्येक ईयरबडमध्ये 37mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 7 तासांपर्यंतचा प्ले बॅक टाइम देते. तर चार्जिंग केसमधील 320mAh ची बॅटरी या इयरबड्सना 25 तासांपर्यंतची बॅटरी लाईफ देते.
Nokia E3103 TWS मध्ये 13mm चे मोठे ऑडियो ड्राईव्हर देण्यात आले आहेत. कनेक्टिविटीसाठी यात लेटेस्ट ब्लूटूथ 5.1 मिळते. तसेच यातील IPX4-रेटिंग पाणी आणि घामापासून संरक्षण करते. यातील व्हॉइस कमांडचा वापर करण्यासाठी Google Assistant सपोर्ट देखील देण्यात आला आहे.