Nokia संपूर्ण वर्ष सक्रिय नसली तरी कंपनी एकदाच अनेक डिवाइस बाजारात घेऊन येते. काही महिन्यांपूर्वी Nokia G11 आणि Nokia G21 स्मार्टफोन लाँच करण्यात आले होते. आता यातील जी 11 चा अपग्रेड व्हर्जन Nokia G11 Plus नावानं येऊ शकतो. तसेच Nokia Style+ देखील सर्टिफिकेशन साईट्सवर दिसला आहे. MySmartPrice च्या रिपोर्टमधून Nokia G11 Plus स्मार्टफोनच्या गिकबेंच लिस्टिंगची माहिती मिळावी आहे. तर Nokia Style+ स्मार्टफोन चायना क्वॉलिटी सर्टिफिकेशन आणि WiFi Alliance डेटाबेसमध्ये दिसला आहे.
गिकबेंचवरील Nokia G11 Plus स्मार्टफोन
Nokia G11 Plus या मार्केटिंग नावासह नोकियाचा आगामी स्मार्टफोन Geekbench 5 डेटाबेसवर लिस्ट करण्यात आला आहे.या स्मार्टफोनला सिंगल कोर टेस्टमध्ये 309 पॉईंट आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 1302 पॉईंट्स मिळाले आहेत. गीकबेंच लिस्टिंगमधून फोनच्या UniSoC प्रोसेसरची माहिती मिळाली आहे. ज्याचा क्लॉक स्पीड 1.61GHz असेल.
सोबत ग्राफिक्ससाठी Mali G57 GPU मिळेल. या फोनमध्ये UniSoC T606 हा एंट्री लेव्हल प्रोसेसर मिळू शकतो. बेंचमार्क लिस्टिंगनुसार नोकियाच्या या फोनमध्ये 4GB रॅम मिळेल. तसेच Nokia G11 Plus स्मार्टफोन Android 12 वर चालेल.
Nokia Style+ देखील येतोय
Nokia Style+ स्मार्टफोन देखील लवकरच लाँच होऊ शकतो. या स्मार्टफोनचा मॉडेल नंबर TA-1448 आहे. जो WiFi Alliance च्या वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. त्यानुसार हा फोन 2.4GHz आणि 5GHz नेटवर्कला सपोर्ट करतो. हा Android 12 वर चालेले. चायना क्वॉलिटी सर्टिफिकेशननुसार Nokia Style+ स्मार्टफोन 20W फास्ट चार्जला सपोर्ट करेल.