नवी दिल्ली-
HMD Global ने आपल्या बजेट Android स्मार्टफोन भारतात लॉन्च केला होता. कंपनीनं त्यास Nokia G11 असं नाव दिलं होतं. आता कंपनीनं या स्मार्टफोनचं अपडेटेड व्हर्जन Nokia G11 Plus लॉन्च केला आहे. पण अपडेटेड स्मार्टफोन असूनही यात फारसे काही बदल केलेले पाहायला मिळालेले नाहीत.
Nokia G11 Plus मध्ये ६.५ इंचाची HD+ स्क्रीन देण्यात आली आहे. याचं स्क्रीन रेज्योल्यूशन 720x1600 पिक्सल इतकं आहे. यात कंपनीनं 90Hx चं रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेट दिला आहे. कंपनीनं अद्याप फोनच्या प्रोसेसरबाबतची माहिती दिलेली नाही. पण समोर आलेल्या माहितीनुसार ऑक्टा कोअर Unisoc T606 प्रोसेसर देण्यात आला आहे.
स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB ची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. इंटरनल मेमरीला microSD कार्ड स्लॉटच्या माध्यमातून 512GB पर्यंत वाढवता येऊ शकतं. फोटोग्राफीबाबत बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये रिअर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सल इतका आहे. तर यासोबतच २-मेगापिक्सलचा सेकंडरी लेन्स देण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन Android 12 वर काम करतो.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनला दोन वर्षांपर्यंत OS अपग्रेड आणि तीन वर्षांसाठी सिक्युरिटी अपग्रेड देण्यात येईल. या स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Nokia G11 Plus ची किंमत आणि उपलब्धताNokia G11 Plus स्मार्टफोन चारकोल ग्रे आणि लेक ब्लू या दोन पर्यायामध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कंपनीनं अद्याप या स्मार्टफोनची किंमत जाहीर केलेली नाही. पण समोर आलेल्या माहितीनुसार याची किंमत १२ हजार रुपयांच्या आसपास असू शकेल.