NOKIA खूप निवडक स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर करते. त्यामुळे कंपनीचा मार्केट शेयर देखील कमी आहे. आता आलेल्या बातमीनुसार HMD Global कंपनी सध्या नोकिया ‘जी’ सीरीजच्या नवीन फोनवर काम करत आहे. हा स्मार्टफोन Nokia G21 नावानं भारतीयांच्या भेटीला येईल, अशी माहिती 91मोबाईल्सनं दिली आहे. हा फोन पुढील महिन्यात भारतात येऊ शकतो.
Nokia G21 India launch
नोकिया जी21 च्या भारतीय लाँचची अधिकृत माहिती कंपनीनं दिली नाही. परंतु 91मोबाईल्सनं सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं आहे कि, नोकिया ब्रँडचा हा आगामी स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात लाँच केला जाईल. अचूक तारीख मात्र या रिपोर्टमधून समोर आली नाही.
Nokia G21 चे लीक स्पेसिफिकेशन्स
नोकिया जी21 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 20:5 अस्पेक्ट रेशियो आणि 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनसह सादर केला जाईल. हा नोकिया फोन Blue आणि Dusk कलरमध्ये विकत घेता येईल. हा एक अँड्रॉइड स्मार्टफोन असेल. यात आक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc चिपसेट दिला जाऊ शकतो. सोबत 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. ही स्टोरेज 512 जीबी पर्यंत एक्सपांड करता येईल.
फोटोग्राफीसाठी नोकिया जी21 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल, सोबत 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळेल. हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह ड्युअल सिम Nokia G21 मध्ये 4जी एलटीई मिळेल. पॉवर बॅकअपसाठी या नोकिया फोनमध्ये 5,050एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.
हे देखील वाचा:
iPhone च्या नावातील ‘i’ चा अर्थ तरी काय?
तुमच्यासाठीच बनलेत हे Smart TV; 15 हजारांच्या आत थिएटरचा अनुभव आणा घरात, फक्त काही दिवस सूट