शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

रेडमी-रियलमीला धक्का! 5050mAh च्या तगड्या बॅटरीसह Nokia G21 येतोय भारतात  

By सिद्धेश जाधव | Published: April 25, 2022 12:40 PM

Nokia G21 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची तारीख ऑनलाईन लीक झाली आहे. हा फोन 50MP कॅमेरा, 4GB RAM, 5050mAh बॅटरी आणि Android 11 सह बाजरात येऊ शकतो.

एचएमडी ग्लोबल आपल्या नोकिया ब्रँड अंतर्गत नवीन स्मार्टफोन भारतात सादर करू शकते. युरोपियन बाजारात उपलब्ध असलेल्या Nokia G21 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती लीक झाली आहे. त्यानुसार हा फोन 50MP कॅमेरा, 4GB RAM, 5050mAh बॅटरी आणि Android 11 सह 26 एप्रिलला देशात लाँच केला जाईल.  

तारीख  

टिप्सटर अभिषेक यादवनं दिलेल्या माहितीनुसार, Nokia G21 भारतात 26 एप्रिलला म्हणजे उद्या लाँच होईल. विशेष म्हणजे कंपनीच्या ट्विटर हॅन्डलवरून देखील ही तारीख याआधी टीज करण्यात आली होती. युरोपमध्ये Nokia G21 ची किंमत 170 युरो (जवळपास 14,560 रुपये) पासून सुरु होते. भारतात हा हँडसेट यापेक्षा स्वस्तात येईल अशी अपेक्षा आहे.  

Nokia G21 चे स्पेसिफिकेशन्स  

Nokia G21 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात Unisoc T606 प्रोसेसरची पावर देण्यात आली आहे, सोबत ग्राफिक्ससाठी Mali G75-MP1 जीपीयू मिळतो. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम मिळतो, त्याचबरोबर 64GB आणि 128GB चे दोन स्टोरेज ऑप्शन आहेत. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते.  

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. नोकियाचा स्मार्टफोनमध्ये Android 11 वर चालतो. यात 5,050mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जसह देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जवर तीन दिवसांचा बॅटरी बॅकअप देते, असा दावा कंपनीनं केला आहे.   

टॅग्स :NokiaनोकियाSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल