Nokia आपल्या स्वस्त 5G स्मार्टफोनवर काम करत आहे, जो नोकिया G50 नावाने सादर केला जाईल. लाँच होण्याआधी या स्मार्टफोनची माहिती लिक्स आणि रिपोर्ट्समधून समोर येऊ लागली आहे. परंतु आता कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजनेच मोठी माहिती समोर ठेवली आहे. कंपनीच्या फ्रांसच्या अकॉउंटवरून नोकिया जी50 चा एक व्हिडीओ शेयर करण्यात आला होता, परंतु लगेचच तो व्हिडीओ डिलीट करण्यात आला. या व्हिडीओमधून या स्मार्टफोनच्या डिजाईन आणि स्पेक्सची माहिती मिळाली आहे.
नोकिया जी50 स्मटफोनचा एक ऑफिशियल प्रोमो Nokia Mobile France च्या इन्स्टाग्राम अकॉउंटवर शेयर करण्यात आला होता. ही पोस्ट आता डिलीट करण्यात आली असली तरी NokiaMob.net ने व्हिडीओ क्लिप आणि इन्स्टाग्राम पोस्टचा स्क्रीनशॉट शेयर केला आहे. इंस्टाग्राम पोस्टनुसार हा स्मार्टफोन शानदार बॅटरी, 5G सपोर्ट आणि 48 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह सादर केला जाईल.
Nokia G50 चे लीक स्पेसिफिकेशन
Nokia G50 हा स्मार्टफोन जी सीरिजमधील पहिला 5G स्मार्टफोन असेल. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 480 5G चिपसेटसह सादर केला जाईल, अशी माहिती समोर आली होती. तसेच या फोनमध्ये 4 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज देण्यात येईल. हा एक अँड्रॉइड 11 ओएस वर चालणार स्मार्टफोन असेल. इंस्टाग्राम पोस्टनुसार हा फोन ब्लू आणि मिडनाइट सन रंगात सादर केला जाईल. Nokia G50 मध्ये वॉटरड्रॉप नॉच आणि वर्तुळाकार रियर कॅमेरा मॉड्यूल मिळेल.
Nokia G50 ची किंमत
LambdaTek या वेबसाइटवर आगामी Nokia G50 5G स्मार्टफोन टॅक्ससह 217.52 GBP (सुमारे 22,100 रुपये) मध्ये लिस्ट करण्यात आला आहे. दुसरीकडे MoreComputers ने आपल्या वेबसाइटवर नोकियाचा हा स्मार्टफोन 207.56 GBP (सुमारे 21,100 रुपये) मध्ये लिस्ट केला आहे. या दोन्ही वेबसाइटवर Nokia G50 स्मार्टफोनचा 4GB रॅम + 64GB मॉडेल लिस्ट करण्यात आला आहे.