नोकियाने आज भारतात लॅपटॉप, दोन टीव्ही रेंज आणि हेडसेट सादर केले आहेत. हे डिवाइस फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होतील. 3 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या बिग बिलियन डेज सेलमधून यांच्या विक्रीला सुरवात होईल. Nokia PureBook S14 लॅपटॉपमध्ये Windows 11 सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात 11th Gen Intel Core प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया नोकियाच्या नव्या लॅपटॉपची किंमत आणि स्पेसीफिकेशन्स.
Nokia PureBook S14 ची किंमत
Nokia PureBook S14 लॅपटॉपची किंमत 56, 990 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने या लॅपटॉपचा एकमेव व्हेरिएंट बाजारात उतरवला आहे, जो 3 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.
त्याचबरोबर फर्स्ट जेनरेशन नोकिया हेडसेट देखील सादर करण्यात आले आहेत. ज्यात T4010 T3030, T3010, आणि T3020 अशा तीन ट्रू वायरलेस इयरबड्सचा समावेश आहे. या TWS रेंजची किंमत 1,499 रुपयांपासून सुरु होईल.
Nokia PureBook S14 चे स्पेसिफिकेशन्स
Nokia PureBook S14 मध्ये मायक्रोसॉफ्टची नवीन Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. या डिवाइसचे वजन फक्त 1.4 किलोग्रॅम आहे. यात प्रोसेसिंगसाठी 11th Gen Intel Core i5 CPU चा वापर करण्यात आला आहे. त्याला Iris Xe इंटिग्रेटेड गग्राफिक्सची जोड देण्यात आली आहे. हा लॅपटॉप डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करत. यात 14-इंचाचा फुल-एचडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 82 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसह सादर करण्यात आला आहे. या नोकियाच्या नव्या लॅपटॉपमध्ये 16GB पर्यंतचा RAM आणि 512GB NVMe SSD स्टोरेज मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी यात यूएसबी टाईप-सी पोर्ट, एचडीएमआय पोर्ट आणि 3.0 यूएसबी टाईप-ए पोर्ट देण्यात आला आहे.