नोकियाने आपला नवीन टॅबलेट Nokia T20 जागतिक बाजारात सादर केला आहे. या टॅबमध्ये 2K डिस्प्ले आणि 8-मिगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात ड्युअल मायक्रोफोन आणि स्टिरियो स्पिकर्स देण्यात आले आहेत. Nokia T20 टॅबमध्ये 4GB रॅम, गुगल किड्स स्पेस आणि दिवसभर चालेल अशी बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत
Nokia T20 ची किंमत 199 युरो (अंदाजे 17,200 रुपये) ठेवण्यात आली आहे, ही फक्त Wi-Fi व्हेरिएंटची किंमत आहे. Wi-Fi + 4G मॉडेलसाठी 239 युरो (अंदाजे 20,600 रुपये) आहे. Wi-Fi व्हेरिएंटमध्ये 3GB RAM + 32GB स्टोरेज आणि 4GB RAM + 64GB स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहेत. Wi-Fi + 4G मॉडेल 4GB + 64GB सह येतो. हा सध्या युरोपात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे, लवकरच हा टॅबलेट भारतात देखील उपलब्ध होऊ शकतो.
स्पेसीफाकेशन्स
Nokia T20 टॅबलेट 10.4-इंचाचा मोठा डिस्प्ले कंपनीने दिला आहे. हा डिस्प्ले 2K रिजोल्यूशन आणि 400 नीट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला टफ ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी Nokia T20 मध्ये ऑक्ट-कोर Unisoc T610 SoC देण्यात आली आहे. त्याचबरोबर 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. हा एक अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि पुढील दोन वर्षाचे अपडेट देखील कंपनी देणार आहे.
या टॅबलेटमध्ये 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ v5.0, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक असे पर्याय मिळतात. त्याचबरोबर यात स्टिरियो स्पीकर देण्यात आले आहेत. Nokia T20 टॅबलेटमध्ये कंपनीने 8,200mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि सिंगल चार्जमध्ये दिवसभर वापरता येईल.