गेल्या महिन्यात Nokia ने आपला Budget 5G Phone जागतिक बाजारात सादर केला होता. हा फोन Nokia G300 नावाने ग्राहकांच्या भेटीला आला होता. आता आपल्या 5G फोनच्या पोर्टफोलियोमध्ये कंपनीने Nokia X100 ची भर टाकली आहे. हा स्वस्त 5G स्मार्टफोन आहे सध्या जागतिक बाजारात लाँच झाला आहे. ज्यात 6GB RAM आणि Qualcomm Snapdragon 480 चिपसेट, 48MP Rear Camera आणि 16MP Selfie सेन्सर देण्यात आला आहे.
Nokia X100
नोकिया एक्स100 चा एकच रॅम आणि स्टोरेज वेरिनेत अमेरिकेत उपलब्ध झाला आहे. ज्याची किंमत 252 डॉलर ठेवण्यात आली आहे, जे भारतीय चलनात 18,500 रुपयांच्या आसपास रूपांतरित होतात. हा फोन भारतात कधी येईल याची अधिकृत माहिती कंपनीने दिलेली नाही.
Nokia X100 चे स्पेसिफिकेशन्स
नोकिया एक्स100 मध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर चालतो. यात क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 480 चिपसेटची पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी Nokia X100 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे. ज्याला 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्सची जोड देण्यात आली आहे. Nokia X100 5G फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससहा या फोनमध्ये साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. नोकिया एक्स100 मधील 4470mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.