नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणारी कंपनी एचएमडी ग्लोबल लवकरच आपला नवीन स्मार्टफोन Nokia XR20 लाँच करू शकते. हा फोन काही दिवसांपूर्वी गीकबेंच लिस्ट करण्यात आला होता. हा नवीन स्मार्टफोननोकिया एक्स20 चा अपग्रेड व्हर्जन असेल कि डाउनग्रेड याची माहिती मात्र अजून समजली नाही. अलीकडेच कंपनीने एका टीजर पोस्टमध्ये सांगतिले होते कि Nokia चा नवीन फोन 27 जुलैला लाँच होईल. या टीजरमध्ये स्मार्टफोनच्या मागे एक मेसेज लिहिण्यात आला आहे कि, आमच्या नवीन नोकिया फोनमध्ये तुम्हाला केसची गरज भासणार नाही. या टीजरमुळे नोकिया एक्सआर20 ची इमेज समोर आल्यानंतर अंदाज लावला जात कि कंपनी एक रगड फोन लाँच करणार आहे.
Nokia XR20
नवीन इमेजमधील कॅमेरा कटआउट आधीच्या टीजरपेक्षा वेगळी दिसत आहे.आधीच्या टीजरमध्ये वर्तुळाकार दिसणारा कॅमेरा कटआऊट आता चौकोनी दिसत आहे. डिवाइसच्या तळाला स्पिकर कटआउट, टाइप-सी पोर्ट आणि हेडफोन जॅक आणि डावीकडे पावर बटण आहे. XR20 मध्ये स्नॅपड्रॅगन 480 5G चिपसेट असू शकतो, अशी चर्चा आहे. हा स्मार्टफोन 6.67-इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले, 48MP + 13MP कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी असू शकते. या फोटोमधील फोनवर पाणी सांडलेले आहे, त्यावरून हा नोकिया स्मार्टफोन IP68 वॉटर रेजिस्टन्ससह येऊ शकतो.
Nokia XR20 स्मार्टफोनला गीकबेंचवर सिंगल कोर टेस्टमध्ये 509 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 1455 स्कोर मिळाला आहे. या लिस्टिंगनुसार हा फोन Android 11 सह सादर केला जाऊ शकतो. या नोकिया फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर असेल. विशेष म्हणजे Nokia X10 आणि Nokia X20 मध्ये देखील हाच प्रोसेसर देण्यात आला होता.
Nokia X10 आणि Nokia X20 चे स्पेसिफिकेशन्स
Nokia X सीरीजच्या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. Nokia X10 आणि Nokia X20 अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच करण्यात आले आहेत, तसेच हे फोन्स आक्टाकोर प्रोसेसरसह ड्युअल मोड 5Gला सपोर्ट करणाऱ्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 480 चिपसेटवर चालतात.
फोटोग्राफीसाठी या दोन्ही नोकिया फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा मिळतो. Nokia X20 मध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे तर Nokia X10 स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या मुख्य सेन्सरला सपोर्ट करतो. दोन्ही फोनमध्ये 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच नोकिया एक्स10 मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे आणि एक्स20 32 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या दोन्ही नोकिया फोन्समध्ये 4,470एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.