यावर्षी जुलैमध्ये वनप्लसचे सहसंस्थापक Carl Pei यांच्या नवीन कंपनी Nothing ने Nothing Ear 1 हे इयरबड्स सादर केले होते. हे TWS EarBuds कंपनीने अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) सपोर्टसह सादर केले आहेत. लाँचच्या वेळी हे बड्स भारतात 5,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाले होते.
लाँचनंतर कंपनीनं या बड्सची किंमत 1,000 रुपयांनी वाढवून 6999 रुपये केली होती. परंतु आता या बड्सवर 700 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे आता 6,299 रुपयांमध्ये Nothing Ear 1 फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील.
Nothing Ear 1 चे फिचर आणि स्पेसिफिकेशन्स
Nothing इयरबड्सचा काही भाग पारदर्शक ठेवण्यात आला आहे, तसेच याच्या चार्जिंग केसचा वरचा भाग देखील पारदर्शक आहे. ही चार्जिंग केस USB Type-C पोर्ट आणि Qi वायरलेस टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते. हे इयरबड्स केसच्या 10 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगसह 8 तास चालू शकतात. केससह Nothing Ear 1 इयरबड्स 34 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतात.
Nothing Ear 1 मध्ये अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन सपोर्ट मिळतो. या इयरबड्समध्ये टच कंट्रोलने व्हॉल्युम, प्लेबॅक आणि नॉइज कॅन्सलेशन नियंत्रित करता येईल. या बड्सची Equaliser Settings, Fast Pairing, Firmware Updates आणि In-Ear Detection इत्यादी सेटिंग सपोर्टेड अॅपने बदलता येते. यात दोन इंटेंसिटी मोडस आणि एक ट्रान्स्परन्सी मोड मिळतो. Nothing Ear 1 मध्ये 11.6mm चे डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. कनेक्टिविटीसाठी या इयरबड्समध्ये Bluetooth 5.2 सह SBC आणि AAC Bluetooth codecs सपोर्ट मिळतो.