वनप्लसचे संस्थापक Carl Pei यांची नवीन कंपनी Nothing 27 जुलै रोजी आपलं पाहिलं प्रोडक्ट Nothing Ear 1 ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या आगामी ट्रूली व्हायरलेस इयरबड्सच्या भारतीय किंमतीची माहिती दिली आहे. Nothing ने सांगितले आहे कि या ऑडियो प्रोडक्टची भारतातील किंमत 5,999 रुपये असेल. (Nothing Ear 1 TWS earbuds price revealed)
Nothing Ear 1 ची किंमत
Nothing Ear 1 ची भारतातील किंमत जागतिक बाजाराच्या तुलनेत खूप कमी आहे. याआधी कंपनीने या प्रोडक्टच्या जागतिक किंमतीची माहिती दिली होती. Nothing ने सांगितले होते कि Ear 1 अमेरिकेत 99 डॉलर म्हणजे 7,300 रुपयांमध्ये विकले जातील. युरोपात हे बड्स 99 युरो म्हणजे 8,700 रुपयांमध्ये उपलब्ध होतील. इतरत्र मिड-प्रीमियम सेगमेंटमध्ये येणारे हे बड्स भारतात मात्र कफायतशीर श्रेणीत दाखल होतील.
Nothing Ear 1 चे फीचर्स
OnePlus चे माजी सहसंस्थापक कार्ल पे यांनी गेल्यावर्षी वनप्लस कंपनी सोडली होती. त्यानंतर त्यांनी नथिंग नावाची आपली स्वतःची नवीन कंपनी सुरु केली. ही कंपनी 27 जुलैला Nothing Ear 1 नावाचा पहिला प्रॉडक्ट फ्लिपकार्टच्या माध्यमातून भारतात लाँच करणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Nothing Ear 1 मध्ये अॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन फीचर असेल. या फीचरसाठी बड्समधील तीन हाय-डेफिनिशन माइक्रोफोनची मदत घेतली जाईल. हे बड्स ट्रान्सपरंट डिजाइनसह सादर करण्यात येतील. यात AirPods Pro सारखे फीचर्स देण्यात येतील.