काही महिन्यांपूर्वी नथिंग कंपनीने स्मार्टफोन लाँच केल्यानंतर आता ईअरबड्स देखील लाँच केले आहेत. स्मार्टफोनप्रमाणेच हे युनिक डिझाईनचे आहेत.
Nothing Ear (Stick) ची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे ईअरफोन ४ नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. एकाच वेळी ४० देशांत याची विक्री केली जाणार आहे. याची विक्री फ्लिपकार्ट आणि मंत्रावरून केली जाणार आहे. कंपनीने याची प्री ऑर्डरदेखील घेण्यास सुरुवात केली आहे.
नथिंग इअर (स्टिक) मध्ये १२.६ मिमी ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. यामुळे रीच डेप्थ, क्लियर हाई आणि डिटेल्स साउंड ऐकायला येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवरही आवाजाची गुणवत्ता सारखीच राहत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
प्रत्येक इअरबडचे वजन 4.4 ग्रॅम आहे. यात सिलिकॉन टीप देण्यात आलेली नाही. इअरबड्स नथिंग एक्स अॅपशी कनेक्टेड असणार आहेत. अॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन, बेस लॉक तंत्रज्ञान देण्यात आले आहे. कानाचा आकार मोजून किती बेसचे नुकसान होत आहे, हे तंत्रज्ञान मोजते आणि त्या प्रमाणे साऊंड क्वालिटी देते. कॉलिंगसाठी इयरबड्समध्ये तीन हाय-डेफिनेशन माइक देण्यात आले आहेत.ईअरफोनची बॅटरी ७ तासांचा लिसनिंग बॅकअप देते. तर 3 तासांपर्यंत टॉकटाइम देते. केससह 22 तासांचा अतिरिक्त चार्ज मिळतो. तसेच 10 मिनिटांच्या चार्जवर 2 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळतो.