नथिंगचा दुसरा स्मार्टफोन टीकेचा धनी ठरला आहे. कंपनीने गेल्या वर्षभरात पहिल्या स्मार्टफोनद्वारे चांगला जम बसविला आहे. दुसरा स्मार्टफोन लाँच केल्यानंतर नथिंगने एक नवा सब ब्रँडची घोषणा केली आहे. Nothing ने इतर उत्पादनांसाठी CMF हा सबब्रँड आणला आहे.
नथिंग फोन २ लाँच झाला आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. आता या दोन्ही स्मार्टफोनना सपोर्ट करण्यासाठी स्मार्टवॉच, ईयरबड्स आणि स्वस्तातले फोनही आणण्यात येणार आहेत. हे सर्व नथिंग या सीएमएफ ब्रँडखाली आणणार आहे.
नथिंगचे सीईओ कार्ल पेई यांनी YouTube वर याची घोषणा केली आहे. नथिंगच फोन २ च्या लाँचिंगवेळीही काही तामझाम न ठेवता युटु्युबर दोघांची मुलाखत टाईप कार्यक्रम ठेवण्यात आला होता. आता हा सबब्रँड परवडणाऱ्या श्रेणीतील उपकरणांसाठी असणार आहे. सीएमएफच्या उत्पादनांमध्ये नथिंगसारखे पारदर्शक डिझाइन उपलब्ध असेल की नाही हे त्यांनी स्पष्ट केलेले नाहीय.
नथिंगही आता चिनी कंपन्यांच्या मार्गावर चालली आहे. शाओमीने रेडमी, व्हिवोने रिअलमी अशा उपकंपन्या स्वस्तातली उत्पादने लाँच करण्यासाठी सुरु केल्या आहेत. CMF by Nothing असे या ब्रँडचे संचालन असणार आहे. यासाठी एक टीम बनविली जाणार आहे. Carl Pei ने CMF संदर्भात एक टीझर देखील जारी केला आहे जो वायरलेस इयरबडसाठी आहे. CMF चे पहिले इयरबड्स २०२४ च्या सुरुवातीला लॉन्च केले जाऊ शकतात.