जर तुम्ही एक उत्तम Android स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टवर तुम्हाला खरेदीची मोठी संधी आहे. ट्रान्सपरंट डिझाइनसाठी लोकप्रिय असलेला नथिंग फोन 1 स्मार्टफोन अतिशय कमी दरात उपलब्ध आहे. Amazon आणि Flipkart च्या दिवाळी सेलला मुकलेल्या वापरकर्त्यांसाठी Nothing Phone 1 ची डील ही एक उत्तम संधी आहे. फ्लिपकार्टवरून तुम्ही ३७,९९९ रुपयांचे 8GB + 128GB मॉडेल केवळ २६,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन ६.५५ इंच डिस्प्ले आणि 50MP ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतो.
नथिंग फोन 1 चे 8GB + 128GB मॉडेल फ्लिपकार्टवर २९,९९९ रुपयांना लिस्ट केला आहे. मात्र, या फोनची खरी किंमत ३७,९९९ रुपये इतकी आहे. हा फोन तुम्ही ऑनलाइन शॉपिंग साइटवरून अगदी स्वस्त दरात खरेदी करू शकता. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म EMI व्यवहारांसाठी CitiBank क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरण्यावर त्वरित १० टक्के सूट देत आहे. अशा पद्धतीनं यूजर्स हा फोन २६,९९९ रुपयांना खरेदी करू शकतात.
सवलत देखील स्वतंत्रपणे उपलब्ध असेलयाशिवाय फ्लिपकार्टही वेगळी सूट देत आहे. वापरकर्त्यांनी २४,९९९ रुपयांच्या खरेदीसाठी Citi क्रेडिट कार्ड वापरल्यास त्यांना ५०० रुपयांची सूट मिळेल. त्याच वेळी ४९,९९९ रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या खरेदीवर २,५०० रुपयांची सूट दिली जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की नथिंग फोन 1 ब्लॅक आणि व्हाईट या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्याचे 8GB + 256GB मॉडेल ३२,९९९ रुपयांना आणि 12GB + 256GB मॉडेल ३५,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.
Nothing Phone 1: Glyph इंटरफेसNothing Phone 1 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अद्वितीय Glyph इंटरफेस. ही स्क्रीन टाइम कमी करण्यात मदत करतं आणि ९०० LEDs सह एक अद्वितीय लाइटअप अनुभव युझरला मिळतो. कॉल किंवा अॅप नोटिफिकेशन्स व्यतिरिक्त चार्जिंग स्टेटस यासारख्या गोष्टींवर हे लाइट्स काम करतात. हा स्मार्टफोन ६.५५ इंचाच्या फुल HD + OLED डिस्प्लेसह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे.
Nothing Phone 1: स्पेसिफिकेशन्स और फीचर्सफोनचा डिस्प्ले HDR10+ आहे आणि समोर आणि मागे कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ च्या लेयरसह येतो. युझर्सना यात मिड-रेंज क्लाकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ प्लस ऑक्टा-कोर चिपसेटचा सपोर्ट मिळतो. त्याच वेळी, स्पीड चार्जिंगसह ४,५०० mAh बॅटरी फोनला देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला 50MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये मुख्य कॅमेरा Sony IMX766 आहे. याशिवाय 16MP फ्रंट कॅमेरा देखील आहे.