शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

Nothing Phone (1): 'नथिंग फोन'ची चार अशी वैशिट्य की जी इतर कोणत्याच स्मार्टफोनमध्ये नाहीत, अगदी iPhone ही फेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 6:35 PM

Nothing Phone (1) हा स्मार्टफोन यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला फोन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Nothing Phone (1) हा स्मार्टफोन यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला फोन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कंपनीनं आपल्या पहिल्याच स्मार्टफोनमधून अनोख्या डिझाइननं सर्वांचं लक्ष वेधून घेण्यास भाग पाडलं आहे. नथिंग फोनचं डिझाइन इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळं आहेच, पण यातील फिचर्स देखील सर्वांच्या कुतुहलाचा विषय ठरत आहेत.   

Nothing Phone (1) च्या वैशिष्ट्यांपैकी चार वैशिष्ट्य अशी आहेत की जी या फोनला इतर स्मार्टफोनच्या गोतावळात आगळंवेगळं ठरवतात. याच चार वैशिष्ट्यांची माहिती जाणून घेऊयात...

१. पारदर्शक डिझाइन (Transparent Design)नथिंग फोन(१) सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे फोनचं डिझाइन हेच आहे. फोनच्या पारदर्शी डिझाइनमुळेच हा फोन इतर फोनपेक्षा वेगळा ठरतो. फोनला ट्रान्सपरंट ग्लासचं बॅक पॅनल दिलं आहे. प्रीमियम फिल येण्यासाठी बॅक पॅनलवर गोरिला ग्लासचं कोटिंग देण्यात आलं आहे. हटके डिझाइनमुळे हा फोन सर्वांचं लक्ष वेधून घेतो. फोन इतका ट्रान्सपरंट आहे की फोनमधील सर्व कम्पोनंट्स बॅक पॅनलमधून दिसतात. 

२. एलइडी लाइट्स  (LED Lights)नोटिफिकेशन्ससाठी एलईडी लाइट्सचा वापर ही स्मार्टफोनसाठी काही नवी बाब नाही. पण याबाबतही 'नथिंग फोन'नं एक पाऊल पुढे टाकलं आहे. मागील बाजूस अनेक स्ट्रीप्स देण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या आकाराच्या या स्ट्रीप्समध्ये ९०० पेक्षा जास्त LEDs आहेत, ज्या युझरला कॉल किंवा मेसेज आल्यावर किंवा फोन चार्ज होत असताना उजळून दिसतात. फोनमध्ये एक लहान लाल LED लाइट देखील आहे युझर व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना ही लाइट पेटते. याशिवाय, युझर्सला LED लाइट्स त्याच्या मर्जीनुसार अॅडजस्ट करू शकतात. याला ग्लिफ इंटरफेस असंही म्हणता येईल. म्हणजेच तुम्हाला एखादा कॉल किंवा नोटिफिकेश येत असेल तर केवळ फोनमागील लाइट्समधून तुम्हाला याची पूर्वसूचना मिळू शकणार आहे.

३. वायरलेस चार्जिंग (Wireless charging)वायरलेस चार्जिंग सपोर्ट असलेले ४०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे फोन बाजारात उपलब्ध नाहीत. पण त्याचवेळी नथिंग फोन कंपनीनं आपल्या पहिल्याच स्मार्टफोनची किंमत बेस मॉडेलसाठी ३२,९९९ रुपये इतकी ठेवली आहे. विशेष म्हणजे यात वायरलेस चार्जिंग सपोर्टही उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. फोन फक्त 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करत असला तरी वायर्ड चार्जिंगसाठी हा एक चांगला पर्याय आहे. उदाहरणार्थ, तुमच्या कारमध्ये वायरलेस चार्जिंग पॅड असल्यास, तुम्ही तुमच्या प्रवासात फोनची 4500 mAh बॅटरी चार्ज करू शकता. 

४. रिसायकल अ‍ॅल्युमिनिअम फ्रेम (Recycled aluminium frame)बाजारात ३० हजार रुपयांच्या किमतीत अ‍ॅल्युमिनिअम फ्रेम असलेला फोन उपलब्ध नाही. 'नथिंग फोन'मध्ये केवळ फ्रेमच नाही तर इतर पार्टसाठीही रिसायकल अ‍ॅल्युमिनिअम वापरण्यात आलं आहे. इतकंच नव्हे, तर फोनचा बॉक्स देखील रिसायकल सामग्रीपासून बनवण्यात आलेला आहे.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनApple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञान