Nothing Phone (1) हा स्मार्टफोन आज जागतिक स्तरावर लाँच करण्यात येणार आहे. या फोनचं लाँच इव्हेंट रात्री साडेआठ वाजता सुरू होईल. लाँचपूर्वीच कंपनीनं या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल काही माहिती दिली होती. यामध्ये ट्रान्सपरंट बॅक देण्यात आलं असून त्याचं डिझाईनही ब्राईट असेल. यासोबतच Nothing Phone (1) मध्ये काही अन्य महत्त्वाचे फीचर्स देण्यात आले असून त्यात 120Hz चा स्क्रिन रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्लेही देण्यात आलाय.
Nothing Phone (1) चं लाँच इव्हेंट रात्री भारतीय वेळेनुसार साडेआठ वाजता सुरू होणार आहे. नथिंग्सच्या युट्युब चॅनलवर ते लाईव्हही पाहता येईल. या स्मार्टफोन मध्ये 6.55 FULL HD+ OLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय रिफ्रेश रेट 120Hz असेल. प्रोसेसर बाबत सांगायचं झालं तर यात कॉलकॉम स्नॅप ड्रॅगन 778G+ SoC असेल. तर दुसरीकडे या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबीचं इंटरनल स्टोरेजही मिळण्याची शक्यता आहे.