शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

आयफोनला टक्कर देणार पारदर्शक Nothing Phone (1)? भारतीय वेबसाईटवर झाला लिस्ट 

By सिद्धेश जाधव | Published: May 14, 2022 6:27 PM

वनप्लसचे माजी सह-संस्थापक कार्ल पे यांची नवीन कंपनीनं Nothing Phone (1) भारतात लाँच करणार आहे.  

Nothing नं आपल्या सर्वात पहिल्या Android स्मार्टफोन Nothing Phone (1) ची अधिकृत माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती. तेव्हापासून हा हँडसेट चर्चेचा विषय ठरला आहे. कार्ल पे यांनी वनप्लस सोडल्यानंतर पहिल्यांदाच ते स्मार्टफोन लाँच करणार आहेत. ताज्या लिक्सनुसार, हा फोन BIS सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसला आहे. त्यामुळे फोन लवकरच भारतात येणार हे निश्चित झालं आहे.  

टिप्सटर मुकुल शर्मानं ट्विटरवरून सांगितलं आहे की, Nothing Phone (1) स्मार्टफोनची भारतातील इंटरनल टेस्टिंग अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच हा फोन Bureau of Indian Standards (BIS) सर्टिफिकेशन वेबसाईटवर देखील दिसला आहे. या लिस्टिंगमधून फोनच्या A063 या मॉडेल नंबरची माहिती मिळाली आहे.  

Nothing Phone 1 चे संभाव्य स्पेक्स  

एका टिपस्टरनं दिलेल्या माहितीनुसार, Nothing Phone 1 मध्ये 6.43 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनचा डिस्प्ले HDR10+ सपोर्टसह येऊ शकतो. हा फोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरसह येईल, ज्यात 8GB पर्यंत RAM मिळू शकतो. सोबत 128GB स्टोरेज मिळू शकते. हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित Nothing OS वर चालेल. 

या फोनचा कॅमेरा सेगमेंट पाहता, फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल. त्याचबरोबर 8MP ची वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो. Nothing Phone 1 मध्ये 4,500mAh ची बॅटरी मिळेल. विशेष म्हणजे या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग दिली जाऊ शकते. 

टिपस्टरनं ही माहिती Amazon वर उपलब्ध असलेल्या Nothing Phone 1 च्या युजर मॅन्युअलमधून दिली आहे. परंतु Nothing Phone 1 ची किंमत मात्र लीक झालेली नाही. फोनचे फीचर्स पाहता हा डिवाइस 30 ते 35 हजारांच्या आत सादर केला जाऊ शकतो.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन