अँड्रॉइड स्मार्टफोन सेगमेंटमध्ये ‘नथिंग’ या नव्या खेळाडूची एंट्री होत आहे आणि ही एंट्री दमदार व्हावी याची पुरेपूर काळजी कंपनीचे संस्थापक Carl Pei घेत आहेत. वनप्लसमधील अनुभवाचा वापर करून त्यांनी आगामी Nothing Phone 1 लाँच आधी कसा चर्चेत राहील याची योजना बनवली आहे. एक एक करून ते या स्मार्टफोनचे फीचर्स आणि लुक्स जगासमोर ठेवत आहेत तसेच पहिल्या 100 युनिट्ससाठी एका वेगळ्या सेलची देखील सुरुवात करण्यात आली आहे.
2 लाखांची बोली
Carl Pei यांच्या कंपनीच्या पहिल्या फोननं लोकांना वेड लावल्याचं दिसत आहे. काल अर्थात 21 जूनला कंपनीनं Stock X सेलवर आगामी Nothing Phone 1 स्मार्टफोनचे 100 यूनिट्स सेलसाठी उपलब्ध केले आहेत. हा एक लिलाव आहे, जिथे एका यूनिटसाठी 2679 डॉलर्स (जवळपास 2,09,333 रुपये) पर्यंतची बोली लागली आहे.
Nothing Phone 1 चे स्पेसिफिकेशन्स
हा फोन 6.55 FHD+ OLED डिस्प्लेसह येऊ शकतो. हा एक पंच होल असलेला डिस्प्ले 90Hz हाय रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल. Nothing Phone 1 मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 कस्टमाइज्ड प्रोसेसर दिला जाऊ शकतो. यात 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज असेल. यात Android 11 वर बेस्ड Nothing OS मिळेल.
फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि फास्ट वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगसह देण्यात येईल. या फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा OIS (ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशन) सह देण्यात येईल. तर सोबत 2MP चा एक मॅक्रो कॅमेरा असण्याची शक्यता आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 32MP कॅमेरा मिळू शकतो.