सॅन फ्रान्सिस्को, दि. 12 - आयफोन, आयपॅड, आयमॅक अशी उत्पादने बाजारात आणून स्मार्ट दुनियेचे चित्रच पालटून टाकणा-या स्टिव्ह जॉब्जच्या अॅपलने आता टीव्ही लॉन्च केला. यासाठी खास 4K HDR अशी प्रणाली तयार केली आहे. विशेष म्हणजे एचडी टीव्हीच्या किमतीतच हा अॅपल टीव्ही उपलब्ध होणार आहे.
स्टीव्ह जॉब्सच्या आवाजील एका क्लिपने सुरुवात झालेल्या सोहळ्यात व्यासपीठावर कंपनीचे टीम कुक अवतरले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. स्टिव्ह जॉब्जचे शब्द, त्याचा आवाज काळजाला भिडणारा असतो, असं सांगताना टीम कुक यांचे डोळे पाणावले. आता आपण ख-या अर्थाने स्टिव्हच्या स्वप्नांची पूर्तता करत आहोत. त्यांनी सुरुवातील स्टिव्ह जॉब्ज थिएटरचे औपचारिकरित्या उद्घाटन केले. त्यानंतर टीम कुक यांनी अॅपल वॉच लाँच केली. त्यानंतर आला टीव्ही. अॅपल टीव्हीची घोषणा करताना व्यासपीठावरील स्क्रीनवर 4K असा शब्द आला आणि सर्वांची उत्सुकता तानली गेली. फोर के म्हणजे, चार हजार. आतापर्यंतच्या एचडी टीव्हीच्या तुलनेत चार हजार पट उत्तम असलेला हा टीव्ही लाँच करत असल्याची टीम कुक यांनी केली.
या टीव्हीची किंमत किती?सध्या या अॅपल टीव्हीची किंमत 149 डॉलर एवढी ठेवण्यात आली आहे. भारतीय रूपयाची तुलना केली तर केवळ साडेनऊ हजार रुपयांना आहे. हा टीव्ही सध्या भारतात उपलब्ध होणार नसला तरी अमेरिकेत तो 22 सप्टेंबरपासून मिळेल.
या टीव्हीवर काय असेल?- एचडीआर टेन आणि डॉल्बी व्हिजन क्षमता असेल. - साध्या एचडी टीव्हीपेक्षा चार हजार पट पिक्सेल्स असलेला हा टीव्ही असेल.- नेटफ्लिक्सवरील चार हजार पिक्चर पाहता येतील. - अॅमेझॉन प्राइम व्हिडोओ यावर वर चालेल.- तुमच्याकडे जर आयपॅड किंवा आयफोन असेल तर तुमच्यासाठी अॅपल टीव्ही हा एक उत्तम पर्याय असेल.- याच कार्यक्रमात लाँच करण्यात आलेला स्काय नावाचा व्हिडीओ गेमही या टीव्हीवर खेळता येणार आहे. हा गेम आठ प्लेअर कोठेही बसून खेळू शकतात.
जानेवारी 2007 मध्ये पहिल्यांदाच अॅपलचे सहसंस्थापक आणि सीईओ जॉब्स यांनी आयफोन लाँच केला होता. अजूनही आयफोन हा जगातील महागडा फोन ओळखला जातो. आयफोनने 1000 डॉलरचा आकडाही ओलांडला आहे.