Instagram ने आता एक नवीन फीचर आपल्या अॅपमध्ये जोडले आहे. इन्स्टाग्राम युजर्स आता त्यांच्या स्टोरीजमध्ये कोणतीही लिंक कॉपी करून अटॅच करू शकतात. आतापर्यंत हे फिचर फक्त 10,000 पेक्षा जास्त फॉलोवर्स असणाऱ्या युजर्ससाठी राखून ठेवण्यात आले होते.
इन्स्टाग्रामने बुधवारी सांगितले कि आधी फक्त वेरीफाइड अकॉउंट किंवा ठराविक फॉलोवर्स असल्यावर युजर्सना इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये लिंक शेयर करता येत होती. परंतु आता सर्व युजर्स त्यांची कोणतीही लिंक शेयर करू शकतील.
इन्स्टाग्रामचे नवीन फीचर
इन्स्टाग्रामने हे फीचर सर्व युजर्ससाठी खुले केल्याची माहिती ब्लॉग पोस्टमधून दिली आहे. आता इन्स्टाग्राम वापरणारे सर्व युजर त्यांच्या स्टोरीजमध्ये कोणतीही लिंक शेयर करू शकतील. यासाठी कोणत्याही नियम किंवा ठराविक फॉलोवर्सची देखील गरज असणार नाही. चला जाणून घेऊया कशाप्रकारे या फीचरचा वापर करायचा ते.
पुढील प्रोसेस फॉलो करा
- सर्वप्रथम तुमच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंटेंट म्हणजे फोटो किंवा व्हिडीओ अॅड करा.
- त्यानंतर टॉप नेव्हिगेशन बारमधून स्टिकर टूलवर क्लिक करा.
- लिंक स्टिकर सिलेक्ट करा आणि त्यानंतर कॉपी केलेली लिंक पेस्ट करा किंवा टाईप करा. त्यानंतर Done वर क्लिक करा.
- आता तुमच्या स्टोरीमध्ये लिंक स्टिकर दिसेल, ज्याचा रंग देखील बदलता येईल.