नवी दिल्ली : आगामी वर्ष ग्राहकांसाठी धमाकेदार असणार आहे. कारण, रिलायन्स जियो येत्या 2019 मध्ये फक्त GigaFiber सर्व्हिसची सुरुवात करणार नाही, तर VoWi-Fi सर्व्हिस लाँच करणार आहे. VoWi-Fi या सर्व्हिसमुळे ग्राहक नेटवर्क नसताना सुद्धा कॉल करु शकणार आहेत.
VoWi-Fi सर्व्हिस : आगामी काळात पब्लिक VoWi-Fi सर्व्हिस लाँच करणार, अशी घोषणा रिलायन्स जिओने गेल्या काही दिवसांपूर्वी केली आहे. एका रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओ सध्या मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगना आणि केरळमध्ये VoWi-Fi सर्व्हिसची चाचणी घेत आहे. VoWi-Fi च्या मदतीने ग्राहक सेलुलर कनेक्टिव्हिटीशिवाय व्हॉइस कॉल करु शकतील.
मोठ्या स्क्रीनचे स्मार्टफोन्स : स्मार्टफोन मोबाईल मार्केटमध्ये सध्या शाओमी, सॅमसंग, वनप्लस, वीवो आणि हुआवे यासारख्या कंपन्यांचा दबदबा आहे. दरम्यान, रिलायन्स जिओने आपल्या फीचर फोनच्या माध्यमातून मार्केटमध्ये स्थान निर्माण केले आहे. मात्र, आगामी वर्षात मोठ्या स्क्रीनचे स्मार्टफोन्स घेऊन येणार आहे. यामुळे रिलायन्स जिओ मार्केटमध्ये धूमाकूळ घालणार असल्याचे दिसते. रिलायन्स जिओचे स्मार्टफोन्स स्वस्त आणि मस्त असणार आहेत. यासाठी कंपनी आपल्या भागिदारांसोबत काम करत आहे.
Jio GigaFiber सर्व्हिस :रिलायन्स जिओने GigaFiber सर्व्हिसची घोषणा गेल्या जुलै महिन्यात केली. त्यानंतर ऑगस्टमध्ये या सर्व्हिसाठी रजिस्ट्रेशन सुद्धा सुरु केले होते. मात्र, कंपनी आपल्या या हाय स्पीड ब्रॉडबँड सर्व्हिसला नवीन वर्षात लाँच करण्याची शक्यता आहे. ही सर्व्हिस देशातील 1,100 शहरांमध्ये लाँच करणार आहे. कंपनीने या सर्व्हिससाठी 50 मिलियन कनेक्शनचे टारगेट ठेवले आहे. ही सर्व्हिस घेण्यासाठी ग्राहकांना Jio.com वर लॉग इन करावे लागणार आहे. याशिवाय जिओ अॅपवर सुद्धा या सर्व्हिससाठी ग्राहक रजिस्ट्रेशन करु शकतात. रजिस्ट्रेशनसाठी अद्याप कोणतीही फी आकारली जात नाही आहे.
5 जी सर्व्हिस : रिलायन्स जिओने स्पेक्ट्रम वाटपाच्या सहा महिन्याच्या आत 5 जी सर्व्हिस लाँच करण्याचा प्लॅन केल्याचे समजते. ही सर्व्हिस 2019-20 मध्ये येणार असल्याची शक्यता आहे. मात्र, भारतात जास्तकरुन या सर्व्हिसचा फायदा ग्राहकांना 2021मध्ये होणार आहे.