शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

कोणत्याही भागात मिळवा सुपरफास्ट इंटरनेट, Elon Musk यांच्या SpaceX कंपनीची मोठी घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 2:23 PM

SpaceX कंपनीच्या Starlink ने एक खास प्रोडक्ट लॉन्च केले आहे.

Elon Musk यांच्या मालकीच्या SpaceX कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपले बहुप्रतिक्षित Starlink Mini डिव्हाईस लॉन्च केले आहे. हा एक अतिशय लहान आकाराचा सॅटेलाईट इंटरनेट अँटिना आहे. याला तुम्ही आपल्या बॅगेत टाकून कुठेही घेऊन जाऊ शकता आणि याद्वारे कुठल्याही भागात सुपरफास्ट इंटरनेट मिळवू शकता. या सॅटेलाईट अँटिनामध्ये इनबिल्ट वायफाय सपोर्ट आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन किंवा लॅपटॉप कनेक्ट करू शकता.

मिळालेल्या माहितीनुसार, या Starlink Mini kit ची किंमत 599 अमेरिकन डॉलर (भारतीय रु. 50,054) आहे. Starlink चे ग्राहक Mini Roam service घेऊ शकतात. परंतू, कंपनीने सध्या यात लिमिटेड डेटा दिला आहे. म्हणजेच, ग्राहकाला महिन्याला फक्त 50GB डेटा मिळेल. भविष्यात ही लिमिट वाढवली जाऊ शकते. 

SpaceX च्या स्टारलिंक व्हीपीने दिली माहितीSpaceX च्या स्टारलिंक इंजीनियरिंगचे व्हीव्ही माइकल निकोलने X प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली. तसेच, लवकरच हे डिव्हाईस आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू होणार असल्याचे सांगितले. 

Starlink Mini चे वजन आणि स्पीड Starlink Mini चे वजन फक्त 1.13 किलोग्राम आहे. कंपनीच्या स्टँडर्ड डिशच्या तुलनेत हे 60 टक्के हलके आहे. या सर्व्हिस अंतर्गत सध्या 100 Mbps ची स्पीड मिळेल. भविष्यात ही स्पीड वाढवली जाऊ शकते. 

2019 में  Starlink ची सुरुवातSpaceX ही इलॉनम मस्क यांची कंपनी आहे. ही कंपनी अंतराळात जाणाऱ्या स्पेसफ्रॉटसाठी रॉकेट लॉन्चर आणि इतर सामान बनवण्याचे काम करते. SpaceX ने 2019 मध्ये  Starlink ची सुरुवात केली होती. याद्वारे कंपनी सॅटेलाईटवर आधारिक इंटरनेट सेवा पुरवते. आतापर्यंत कंपनीने 6 हजारांपेक्षा जास्त सॅटेलाईट अंतराळात पाठवल्या आहेत. सध्या जगभरात याचे 30 लाख ग्राहक असून, 100 पेक्षा जास्त देशांमध्ये सेवा सुरू आहे.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटरtechnologyतंत्रज्ञान