नवी दिल्ली : रात्रीच्यावेळी निरभ्र आकाशात चंद्र, तारे पाहण्याची मजा काही औरच असते. मात्र, नजीकच्या काळात आकाशात एखादी चमकणारी वस्तू दिसल्यास नवल वाटून घेऊ नका. ती जाहिरात असणार आहे. स्टार्टरॉकेट नावाच्या रशियन कंपनीने अंतराळात जाहिरात लावण्यासाठी एक योजना आणली आहे.
ही कंपनी आकाशात छोटे छोटे सॅटेलईट पाठविणार आहे जे सुर्याचा प्रकाश परिवर्तीत करणार आहेत. या प्रकाशाद्वारे रात्रीच्या वेळी शब्द किंवा व्यक्तींच्या छबी दिसणार आहेत. 2021 पर्यंत पहिली जाहिरात दिसण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे ही जाहिरात जगभरातील अब्जावधी लोक एकाचवेळी पाहू शकणार आहेत.
जाहिरातीसाठी एकाचवेळी अनेक सॅटेलाईट एकसाथ शब्द किंवा लोकांच्या मालिकांमध्ये पाठविले जाणार आहेत. प्रत्येक सॅटेलाईटला तीस फूट लांबीचा प्रतिबिंब सेल जोडलेला असणार आहे, जो सुर्यप्रकाशाला पृथ्वीवर पाठविणार आहे. हे सॅटेलाईट जमिनीपासून 480 किमी उंचीवर तरंगत राहणार आहेत.
2020 पर्यंत सुरु होईल चाचणीपहिले प्रायोगिक जाहिरात पुढील वर्षी लाँच केली जाईल. यानंतर 50 चौ किमी आकाराच्या जाहिराती दाखविण्यात येणार आहेत. ज्या दिवसाला तीने ते चार वेळा आणि एका वेळी सहा मिनिटांपर्यंत दिसणार आहेत.