लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगातील प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आणि सर्वांत मोठ्या व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूबचा यूजर्सना अधिक चांगल्या प्रकारे अनुभव घेता येणार आहे. व्हिडीओ पाहताना पटापट व्हिडीओ फॉरवर्ड करण्यासह डार्क थीम, ऑडिओ कंट्रोल, स्क्रीन लॉकसह जवळपास ३६ नवे फीचर्स यूट्यूबने जारी केले आहेत. तसेच तुम्ही यापूर्वी पाहिलेल्या व्हिडीओंची माहिती वा नव्याने एखादा व्हिडीओ शोधायचा असल्यास ‘यू’ टॅब लाँच केले आहे.
२० सेकंदांपर्यंत फास्ट फॉरवर्डआतापर्यंत यूट्यूबवर १० सेकंदांपर्यंत व्हिडीओ फास्ट फॉरवर्ड करता येत होते. अपडेटनुसार आता तो २० सेकंदांपर्यंत करता येणार आहे. तसेच यूट्यूबने मोबाइलवर स्क्रीन लॉक मोड हे फीचर आणले आहे. त्यामुळे व्हिडीओ पाहताना चुकून टच झाल्यास काही अडचण येणार नाही.
‘यू’ सर्च बटनयूट्यूबवर व्हिडीओ शोधायचा असेल किंवा पूर्वी पाहिलेला व्हिडीओ पुन्हा शोधण्यासाठी ‘यू’ टॅब देण्यात आली आहे. त्यासाठी लायब्ररी व अकाउंट टॅब एकत्र केला आहे.
इतर फीचर्स कोणती? nअधिक मोठे प्रीव्ह्यू थंबनेल्स nस्मार्ट टीव्हीसाठी नवा व्हर्टिकल मेन्यू nअद्ययावत सबस्क्राइब बटनnडिस्क्रिप्शनमधून व्हिडीओ लिंक कॉपीची सुविधाnॲम्बियंट मोड, लाइट मोड, डार्क मोड nऑडिओ कंट्रोलnएआय क्रिएटर टूल.