बर्लिन - जगातील पहिला वेअरेबल स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. बर्लिनमध्ये IFA 2018 सोहळ्यात हा स्मार्टफोन प्रथम दिसला. Nubia-a (Alpha) असे या स्मार्टफोनचे नाव आहे. घड्याळाप्रमाणे हा स्मार्टफोन तुम्हाला मनगटावर बांधता येईल. हा स्मार्टफोन पूर्णपणे OLED टचस्क्रीनने व्यापलेला असून याचा डिसप्ले फ्लेक्झीबल असणार आहे. नुबियाने या स्मार्टफोनमध्ये काही नवे तंत्रज्ञान विकसीत केले आहेत.
जगातील पहिला वेअरेबल स्मार्टफोन असणाऱ्या Nubia-a (Alpha) स्मार्टफोनमध्ये अनेक हायटेक फिचर्स असणार आहेत. या स्मार्टफोनच्या पुढील बाजूस कॅमेरा असून सोबतच एक मायक्रोफोन आणि बटनही आहे. तर स्मार्टफोनच्या पाठिमागील बाजूस चार्जिंगची सुविधा असून हर्ट रेट सेन्सरही बसविण्यात आला आहे. सध्या, काळ्या आणि सोनेरी रंगाच्या दोन प्रकारात हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. सध्यातरी कंपनीने या स्मार्टफोनबद्दलचे डिटेल्स शेअर केले नाहीत. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत अद्याप गुलदस्त्यातच आहे. या वेअरेबल स्मार्टफोनसोबतच चायनिज कंपनीकडून Nubia Red Magic हा लेटेस्ट स्मार्टफोन लाँच करण्यात येत आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची कंपनीची योजना आहे. Nubia Red Magic या स्मार्टफोनची किंमत साधारणत: 450 युरो म्हणजेच 37,200 रुपये असणार आहे. या फोनचा डिस्प्ले 6 इंच फूल एचडी आणि 1800*2160 पिक्सेल रिसॉल्वोशन आहे. डबल सीम कपॅसिटी असणाऱ्या या फोनचा कॅमेरा 24 मेगा पिक्सेल असून यामध्ये ISOCELL इमेज सेन्सर असणार आहे. तर स्मार्टफोनच्या पुढील बाजून 8 मेगापिक्सेलचाही कॅमेरा असेल.