शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

आता घरबसल्या व्हॉट्सॲपवर मिळवू शकता लसीकरणाचे सर्टिफिकेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 12:24 PM

हे लसीकरणाचे प्रमाणपत्र आपण घरबसल्याही सहजपणे प्राप्त करू शकतो. यासाठी गरज आहे ती स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन एवढीच.

प्रसाद ताम्हनकर सध्या कोरोनाच्या नव्या अवताराने जगाला धडकी भरवली आहे. जगभरातील लहान मोठे देश कोरोनाच्या या नव्या अवताराचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवत आहेत. भारतातील केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनीही आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही कठोर नियमांचा अवलंब करण्यास नागरिकांना सांगितले आहे.आजवर भारतात १३३ कोटी लोकांचे लसीकरण (किमान एक मात्रा)  पूर्ण झाले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत जोडीलाच काही बंधनेही लादण्यात आली आहेत. यापुढे तुम्हाला एखाद्या मॉलमध्ये अथवा चित्रपटगृह, नाट्यमंदिराला भेट देण्यासाठी किंवा सरकारी वाहतूकसेवा, रेल्वे, विमान प्रवास यांचा लाभ घेण्यासाठी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र (Covid-19 Vaccination Certificate) आवश्यक करण्यात आले आहे.हे लसीकरणाचे प्रमाणपत्र आपण घरबसल्याही सहजपणे प्राप्त करू शकतो. यासाठी गरज आहे ती स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन एवढीच. तुमच्या एक किंवा दोन लसीकरण पूर्ण झाल्याचे असे दोन्ही प्रमाणपत्र तुम्ही इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून मिळवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त ९०१३१५१५१५ हा मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह करायचा आहे.एकदा हा नंबर सेव्ह झाला की, त्या नंबरवर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून Certificate असा शब्द टाइप करून पाठवायचा आहे. ज्या मोबाइल नंबरवरून तुम्ही हा मेसेज पाठवणार आहात, तो नंबर लसीकरणाच्या वेळी रजिस्टर केलेला असणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. एकदा हा मेसेज तुमच्या नंबरवरून गेला की, काही वेळातच तुमच्या एक किंवा दोन ज्या काही लसी घेऊन झाल्या असतील, त्यांच्या लसीकरणाचे सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या मेसेजचा रिप्लाय म्हणून ताबडतोब पाठवले जाईल. हे सर्टिफिकेट तुम्ही मोबाइलमध्ये सेव्ह करू शकता किंवा त्याची प्रिंट आउट काढून गरजेच्या ठिकाणी ती दाखवून आपले काम सहजपणे पारही पाडू शकता.prasad.tamhankar@gmail.com

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप