WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फीचर आणलं आहे. युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन हे फीचर सादर करण्यात आलं आहे. बऱ्याच दिवसांपासून या फीचरची चर्चा रंगली होती. कंपनी खूप दिवसांपासून याची चाचणी करत होती आणि आता हे फीचर रोल आउट करायला सुरुवात झाली आहे. सध्या, हे फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. स्क्रीन ब्लॉकिंग फीचरच्या मदतीने, युजर्स View Once म्हणून पाठवलेले व्हिडीओ आणि फोटोंचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत.
WABetainfo च्या रिपोर्टनुसार, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने काही बीटा टेस्टर्ससाठी स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फीचर रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. रिपोर्ट्सनुसार,WhatsApp व्ह्यू वन्स फोटो आणि व्हिडिओची नवीन आवृत्ती रिलीज करणार आहे. युजर्सना स्क्रीनशॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यापासून रोखून युजर्सची प्रायव्हसी ही अधिक चांगली करणं हा त्याचा उद्देश आहे.
सध्या WhatsApp चं हे फीचर फक्त काही बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. यासाठी युजर्सला गुगल प्ले स्टोअरवरून WhatsApp चे नवीन बीटा व्हर्जन डाउनलोड करावे लागेल. जर एखाद्या युजरने View Once म्हणून फोटो किंवा व्हिडीओ पाठवला, तर ज्या युजरने स्क्रीनशॉट घेतला आहे त्याला एक एरर दिसेल, ज्यामध्ये सुरक्षा धोरणामुळे स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही असे लिहिलेले असेल. इतकेच नाही तर जर एखाद्या युजरने थर्ड पार्टी एपवरून स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला स्क्रीन ब्लॅक दिसेल.
जर कोणी तुमच्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेतला तर तो तुम्हाला कधीही नोटीफिकेशन पाठवणार नाही. तथापि, स्क्रीनशॉट प्रायव्हसी अंतर्गत ब्लॉक केलं जाईल. नवीन फीचर फक्त फोटो आणि व्हिडिओसाठी आहे. त्यामुळे वापरकर्ते थेट ब्लॉक करू शकतात. याशिवाय युजर्स नेहमीप्रमाणे फोटो आणि व्हिडीओ फॉरवर्ड, सेव्ह किंवा एक्सपोर्ट करू शकत नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"