गेमिंग स्मार्टफोन कंपनी नूबियानं चीनमध्ये Nubia Red Magic 7 सीरिजमध्ये Red Magic 7 आणि Red Magic 7 Pro असे दोन गेमिंग स्मार्टफोन लाँच केले आहेत. ज्यात Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 16GB RAM, आणि 64MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सध्या हे दोन्ही फोन चीनमध्ये लाँच झाले आहेत. चला जाणून घेऊया या दमदार मोबाईल्सची किंमत आणि स्पेक्स.
Nubia Red Magic 7 चे स्पेसिफिकेशन
Nubia Red Magic 7 मध्ये 6.8-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 165Hz रिफ्रेश रेट, 720Hz टच सॅम्प्लिंग रेट आणि 600 निट्स पीक ब्राईट्नेसला सपोर्ट करतो. यात Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर सोबत 12GB पर्यंत LPDDR5 RAM देण्यात आला आहे. बॅक पॅनल वर 64MP चा प्रायमरी सेन्सर, 8MP ची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. तर फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. यातील 4,500mAh ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज होते.
Nubia Red Magic 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Nubia Red Magic 7 Pro चे बरेचशे फिचर स्टँडर्ड मॉडेलसारखे आहेत. यात गेमिंगसाठी शोल्डर बटन्स देण्यात आले आहेत. डिवाइसमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 18GB पर्यंत RAM आणि Red Core 1 डेडिकेटेड गेमिंग चिप मिळते. यात ICE 9.0 कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. यात 16MP चा अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर यातील 5,000mAh बॅटरी 135W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Nubia Red Magic 7 सीरिजची किंमत
- Nubia Red Magic 7 8GB/128GB: 3,899 युआन (जवळपास 46,000 रुपये)
- Nubia Red Magic 7 12GB/128GB: 4,399 युआन (जवळपास 52,000 रुपये)
- Nubia Red Magic 7 12GB/256GB: 4,799 युआन (जवळपास Rs. 56,800 रुपये)
- Nubia Red Magic 7 Pro 12GB/128GB: 4,799 युआन (जवळपास 56,800 रुपये)
- Nubia Red Magic 7 Pro 12GB/256GB: 5,199 युआन (जवळपास 61,500 रुपये)
- Nubia Red Magic 7 Pro 16GB/256GB: 5,599 युआन (जवळपास 66,200 रुपये)
यापेक्षाही जास्त रॅम आणि स्टोरेज मॉडेल कंपनीनं लाँच केले आहेत. परंतु त्यांची किंमत समजली नाही.