Nubia लवकरच आपला आगामी गेमिंग फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करू शकते. पुढील वर्षाच्या सुरवातीला RedMagic 7 सीरीज ग्राहकांच्या भेटीला येऊ शकते. या सीरिजमध्ये RedMagic 7 आणि RedMagic 7 Pro हे दोन Gaming Phone सादर केले जाऊ शकतात. कंपनीने या फोन्सची अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, आता RedMagic 7 एका सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे.
लाँच होण्याआधी सीरिजमधील RedMagic 7 स्मार्टफोन Bluetooth SIG सर्टिफिकेशन्स वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून या फोन्सच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. चला जाणून घेऊया Nubia RedMagic 7 स्मार्टफोनचे लीक स्पेसिफिकेशन्स आणि फीचर.
RedMagic 7 लीक स्पेसिफिकेशन्स
Nubia RedMagic 7 स्मार्टफोन Bluetooth SIG वेबसाईटवर NX679J या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून फोनमधील Bluetooth 5.2 कनेक्टिव्हिटीची माहिती मिळाली आहे. याव्यतिरिक इतर कोणतीही माहिती या वेबसाईटवरून मिळाली नाही. परंतु याआधी हा फोन अनेक वेबसाईटवर लिस्ट झाला आहे.
लिक्सनुसार आगामी RedMagic 7 गेमिंग स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा आगामी फ्लॅगशिप चिपसेट मिळेल. म्हणजे हा फोन Snapdragon 8 Gen 1 SOC सह बाजारात येईल. तसेच हा फ्लॅगशिप गेमिंग 165Hz रिफ्रेश असलेल्या डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. जो एक OLED पॅनल असेल. त्याचबरोबर 120W पर्यंतची फास्ट चार्जिंग आणि 16GB रॅम असे जबरदस्त स्पेसिफिकेशन देखील मिळू शकतात.