जगातील बहुतांश उपकरणे आणि अन्य प्रॉडक्ट स्मार्ट होत असतांना आता आपली वस्त्रेदेखील स्मार्ट होणार असल्याचे दिसून येत आहेत. या अनुषंगाने लिवाईजने ( Levi's ) गुगल कंपनीच्या मदतीने तयार केलेले कम्युटर ट्रकर जॅकेट बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. २ ऑक्टोबरपासून कंपनीच्या संकेतस्थळावरून याची विक्री सुरू झाली आहे. हे जॅकेट गुगल कंपनीने विकसित केलेल्या जॅक्वॉर्ड या स्मार्ट वस्त्रांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रणालीच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. यात हाताच्या हालचालींनी नियंत्रीत होणार्या तसेच आतील भागात सर्कीट लावलेल्या धाग्यांना स्मार्टफोनला कनेक्ट करण्यात येते. यासाठी स्वतंत्र अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपमध्ये हाताच्या विविध स्पर्शांना विविध फंक्शन्ससाठी कस्टमाईज्ड करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.
कम्युटर ट्रकर जॅकेटच्या बाह्यांना स्मार्ट टचची सुविधा देण्यात आली आहे. अर्थात या जॅकेटच्या मनगटावर हाताचा स्पर्श करून विविध फंक्शन्सला कार्यान्वित करणे शक्य आहे. याला स्मार्टफोन संलग्न करता येतो. यामुळे कॉल आल्यानंतर हाताच्या बाहीला स्पर्श करून कॉल रिसिव्ह करता येतो. यात कॉल रिजेक्ट करण्यासासह अन्य विविध फंक्शन्सचे कार्यान्वयनदेखील करता येते. यात दिशादर्शनाच्या जोडीला म्युझिक ट्रॅक बदलणे वा त्याचा ध्वनी कमी/जास्त करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. यात स्मार्ट टचसाठी एक लहानसे उपकरण देण्यात आले असून ते मनगटावर फिक्स करण्यात येते. हे उपकरण काढल्यानंतर हे जॅकेट धुतादेखील येते. नावातच नमूद असल्यानुसार हे स्मार्ट जॅकेट खास करून बाईकर्ससाठी विकसित करण्यात आले असून याचे मूल्य ३५० डॉलर्स इतके असेल.
पहा: लिवाईज आणि गुगलने एकत्रीतपणे तयार केलेल्या या स्मार्ट जॅकेटच्या कार्यप्रणालीची प्राथमिक माहिती देणारा व्हिडीओ.