शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

अवघ्या ३ हजारात जुना TV होऊन जाईल Smart TV, कसं? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 3:46 PM

सध्याच्या काळात स्मार्ट टीव्हीची मागणी आणि गरज दोन्ही वाढली आहे. नवीन स्मार्टफोन बाजारात येताच यूझर्स ज्या पद्धतीने बदलतात, त्यानुसार टीव्ही बदलू शकत नाही.

सध्याच्या काळात स्मार्ट टीव्हीची मागणी आणि गरज दोन्ही वाढली आहे. नवीन स्मार्टफोन बाजारात येताच यूझर्स ज्या पद्धतीने बदलतात, त्यानुसार टीव्ही बदलू शकत नाही. तुम्हालाही स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल पण बजेट तुम्हाला साथ देत नसेल तर आज तुमचे टेन्शन दूर होईल. आता तुम्ही तुमच्या जुन्या डब्बा टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकता. आज आपण अशाच उपकरणाबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा टीव्ही इंटरनेटशी कनेक्ट करू शकता. 

आता तुम्ही विचार करत असाल की ऑडिओचे काय करावे, तर तुम्ही साउंडबारला 3.5mm हेडफोनने कनेक्ट करू शकता, यामुळे तुमच्या जुन्या टीव्हीची ऑडिओ गुणवत्ता देखील सुधारेल. लक्षात असू द्या की स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही बॉक्स कनेक्ट करण्यासाठी जुन्या टीव्हीमध्ये HDMI पोर्ट असणे आवश्यक आहे.

टीव्हीला HDMI पोर्ट नाही?तुमच्या जुन्या टीव्हीमध्ये HDMI पोर्ट नसेल तर तुम्ही या परिस्थितीत कोणतेही HDMI ते AV/ARC कन्व्हर्टर वापरू शकता. याशिवाय तुमच्या घरात वाय-फाय कनेक्टिव्हिटी असणे खूप महत्त्वाचं आहे. आज आपण Android उपकरणांबद्दल माहिती घेणार आहोत जे तुमच्या जुन्या टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकतील.

या उपकरणांमुळे जुना टीव्ही होईल स्मार्टAmazon Fire TV Stick with Alexa Voice Remote: अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक अॅलेक्सासह सुसज्ज व्हॉइस रिमोट कंट्रोल सपोर्टसह स्मार्ट टीव्हीचा अनुभव देते. यात, तुम्हाला Youtube सोबत सर्व लोकप्रिय स्ट्रीमिंग अॅप्सचा वापर करता येतो. तुम्ही तुमच्या जुन्या टीव्हीसाठी फायर टीव्ही स्टिकच्या नॉन-4K आवृत्तीचा पर्याय निवडू शकता. ही स्टिक टीव्हीच्या एचडीएमआय पोर्टशी कनेक्ट होते आणि त्याची किंमत ३,९९९ रुपये इतकी आहे.

Tata Sky Binge+ Android set-top-box: Tata Sky Binge+ Android सेट टॉप बॉक्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या लॅपटॉप, टॅबलेट किंवा फोनवर कोणताही कार्यक्रम, चित्रपट, संगीत आणि गेम पाहू शकता. सेट टॉप बॉक्सच्या इंटरनल Chromecast फिचरमुळे तुम्ही थेट तुमच्या टीव्हीवरही याचा अनुभव घेऊ शकता. याशिवाय यामध्ये गुगल असिस्टंट देण्यात आले असून ते व्हॉईस सर्च फीचरलाही सपोर्ट करतं. यामध्ये तुम्ही Google Play Store वरून गेम्स आणि अॅप्सचाही अॅक्सेस मिळवू शकता. हे 4K, HD LED, LCD किंवा प्लाझ्मा तंत्रज्ञानासह सर्व टीव्हींना सपोर्ट करतं. Tata Sky Binge+ Android सेट-टॉप-बॉक्सची किंमत ३,९९९ रुपये आहे.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन