Tokyo Olympics 2020 मध्ये भारतासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना शाओमी आपला फ्लॅगशिप Mi 11 Ultra स्मार्टफोन भेट देणार आहे. शनिवारी ऑलिम्पिक 2020 ची सांगता झाली, शेवटच्या दिवशी नीरज चोप्राने भारताला अथेलेटिक्समधील पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. नीरजसह इतर सात पदक विजेत्यांना शाओमी स्मार्टफोन बक्षीस म्हणून देणार आहे. शाओमीचे सीईओ मनू कुमार जैन यांनी ट्वीट करून खेळाडूंचे आभार मनात ही घोषणा केली आहे.
टोकियो ऑलिंपिक्स 2020 मध्ये भारताने आपली आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी करत सात पदकं मिळवली. यात नीरज चोप्रा, मीराबाई चानू, रवी कुमार दहिया, लवलीना बोरगेन, पी. व्ही. सिंधु, बजरंग पुनिया आणि पुरुष हॉकी संघाचा समावेश आहे. यातील वैयक्तिक पदक विजेत्यांना शाओमी आपला सर्वात प्रीमियम Mi 11 Ultra स्मार्टफोन भेट देणार आहे. तर कांस्य पदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघाच्या प्रत्येक सदस्याला Mi 11X देण्याची घोषणा मनू कुमार जैन यांनी केली आहे.
BCCI देखील देणार खेळाडूंना बक्षीस
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसाठी रोख बक्षीस रक्कमेची घोषणा केली. बीसीसीआय सुवर्णपदक विजेत्या नीरजला 1 कोटी, रौप्यपदक विजेत्या मीराबाई व रवी दहिया यांना प्रत्येकी 50 लाख, कांस्यपदक विजेते पी व्ही सिंधू, लवलिना बोरगोईन आणि बजरंग पुनिया यांना प्रत्येकी 25 लाख व भारतीय पुरूष हॉकी संघाला 1.25 कोटी रुपये देणार आहे.