लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: स्मार्टफोन वापरणारे तरुण हेडफोन, इअरफोन आणि इअरबड्स वापरल्याशिवाय राहू शकत नाहीत, असे जगभरातील सध्याचे वास्तव आहे. अशा तरुणांसाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) गंभीर इशारा दिला आहे. हेडफोन कानांसाठी अत्यंत घातक असून, २०५० पर्यंत जगातील १०० कोटी लोक त्यामुळे बहिरे होतील, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
अहवालानुसार आगामी २५ वर्षांत हेडफोनमुळे प्रत्येक ४ जणांपैकी ३ जण बहिरे झालेले असतील. हेडफोनमुळे बहिरे होणाऱ्या लोकांचे वय १२ ते ३५ वर्षे यादरम्यान असेल.
- २५% लोक हेडफोनमुळे बहिरे झाले आहेत.
- ५०% लोक आसपासच्या मोठ्या आवाजातील संगीतामुळे, अथवा सिनेमा, बार अथवा अन्य तीव्र आवाजाच्या संपर्कात आल्यामुळे बहिरे झाले आहेत.
काय कराल?
- १०० डेसीबलपेक्षा अधिक आवाजाच्या ठिकाणी थांबू नये.- शांत झोनमध्ये बसावे.- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे.- हेडफोनचा व्हॉल्यूम कमी ठेवावा.- गोंगाटाच्या ठिकाणी इअरप्लग.- नियमित कानाची तपासणी करणे.
किती आवाज सुरक्षित?
- इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सरासरी ७५ ते १०५ डेसीबल (डीबी) आवाज वापरला जायला हवा.- ॲपल वॉच ९० डीबी आवाज झाल्यास अलर्ट जारी करते. खरे तर मानवी कानांसाठी २० ते ३० डीबी आवाज सुरक्षित आहे.