शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

बापरे...! सॅमसंगच्या मोबाईलमध्ये येणार 64 मेगापिक्सलचा कॅमेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 4:50 PM

दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने स्मार्टफोनसाठी 64 मेगापिक्सलचा कॅमेरा तयार केला आहे.

सध्या स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांमध्ये कॅमेरांची संख्या आणि त्यांच्या क्षमतेवरून मोठी स्पर्धा लागलेली आहे. दर 10 दिवसाला वेगवेगळी कंपनी मोबाईल लाँच करतच आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय असतो तो म्हणजे कॅमेरा. सध्या बाजारात सोनीच्या 48MP IMX586 सेन्सरच्या कॅमेराची चलती आहे. परंतु आता या कॅमेराला सॅमसंगच्या रुपात तगडा प्रतिस्पर्धी मिळणार आहे. 

दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने स्मार्टफोनसाठी 64 मेगापिक्सलचा कॅमेरा तयार केला आहे. हा सेन्सर साधारण वातावरणात 64 मेगापिक्सल आणि अंधारात 16 मेगापिक्सलचे फोटो खेचू शकणार आहे. अत्युच्च फोटोग्राफीसाठी सॅमसंगने 64MP ISOCELL Bright GW1 सेन्सरमध्ये रेमोजेक अल्गोरिदम आणि पिक्सल मर्जिंग टेट्रासेल टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. कंपनीने यामध्ये 100dB पर्यंतचा रिअलटाईम HDR सपोर्ट देण्यात आला आहे. सध्याच्या कॅमेरांची रेंज 60dB पर्यंत असते. 

हा सेन्सर ड्युअल कन्व्हर्जन गेनसोबत येतो. जो नॉईस कमी करण्याबरोबरच फोटोमध्ये रंग एकदम बरोबर भरतो. यासोबत हाय-परफॉर्मेंस फेज डिटेक्शन, ऑटोफोकस टेक्नॉलॉजी आणि फुल एचडी सपोर्ट देण्यात आला आहे. या सेन्सरमध्ये 480 फ्रेम प्रतीसेकंद वेगात स्लो-मोशन व्हिडीओ शूट केला जाऊ शकतो. 

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या सेन्सर व्यापाराचे उपाध्यक्ष यॉन्गिन पार्क यांनी सांगितले की, अॅडव्हान्स आणि जादा पिक्सल टॅक्नॉलॉजीमुळे सॅमसंगचा नवा कॅमेरा चांगल्या फोटोग्राफीला नवीन दिशा देणार आहे. तसेच युजरच्या रेकॉर्डिंगच्या अनुभवाला बदलून टाकणार आहे. सॅमसंग या सेन्सरला कोणत्या मोबाईलमध्ये वापरणार आहे ते जाहीर केलेले नाही. मात्र, एका अंदाजानुसार गॅलेक्सी एस सिरिज आणि नोट सिरिजच्या पुढील डिव्हाईसमध्ये मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :samsungसॅमसंग