शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

OMG! आयफोन १४ ची लोकप्रियता घसरली; अ‍ॅपलला दशकातला सर्वात मोठा फटका, ही चूक नडली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 6:54 PM

ही घसरण फक्त iPhone 14 च्या बेस मॉडेलमध्येच नाही, तर iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये दिसून आली आहे.

जगातील सर्वात महागडी स्मार्टफोन मेकर कंपनी अ‍ॅपलला गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच एवढा जबर धक्का बसला आहे. अ‍ॅपल गेली काही वर्षे तेच तेच डिझाईनचे आयफोन लाँच करत आहे. यामुळे त्यात नाविन्य असे काहीच नसते. त्याचा परिणाम असा झाला की गेल्या ११ वर्षांत पहिल्यांदाच आयफोनची पॉप्युलॅरिटी घसरली आहे. 

गेल्या दशकभरात iPhone 14 ला तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाहीय. आयफोनच्या इतिहासात iPhone 5 वर अखेरची टीका झाली होती. यानंतर आयफोन १४ ला सर्वात कमी ५ स्टार रेटिंग मिळाली आहे. हा सर्व्हे perfectRec नावाच्या कंपनीने केला आहे. त्यांनी थोडे थोडके नव्हे तर 6,69,000 हून अधिक युजर्सनी दिलेल्या प्रतिक्रियांचा अभ्यास केला आहे. 

आयफोन 14 लोकांमध्ये पूर्वीच्या आयफोनप्रमाणे लोकप्रिय झालेला नाही, हे या सर्व्हेतून दिसत आहे. आयफोन 5 च्या लोकप्रियतेत थोडीशी घट झाल्याचेही दिसले आहे. याशिवाय iPhone 6 ते iPhone 13 पर्यंत सर्व फोनचे रेटिंग वाढले आहे. iPhone 13 ला 80% पर्यंत 5-स्टार रेटिंग मिळाले, तर iPhone 14 हा 72% टक्क्यांवर घसरला आहे. 

ही घसरण फक्त iPhone 14 च्या बेस मॉडेलमध्येच नाही, तर iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये दिसून आली आहे. आयफोनच्या 5 स्टार रेटिंगमध्ये वाढ हे आयफोनने कालांतराने स्वतःमध्ये सुधारणा केल्यामुळे झाली आहे. Apple च्या हार्डवेअर, वैशिष्ट्ये आणि डिझाइनमध्ये कोणतेही मोठे बदल न केल्यामुळे आयफोन १४ ला रेटिंगमध्ये फटका बसला आहे. याशिवाय कंपनीने लेटेस्ट जनरेशनच्या आयफोनमध्ये जुना प्रोसेसर वापरला आहे. नवीन डायनॅमिक आयलंड फीचर फक्त प्रो मॉडेल्ससाठी दिले आहे. याचाही परिणाम झाला आहे. 

टॅग्स :Apple Incअॅपल