आयफोन १५ सिरीज १२ सप्टेंबरला लाँच होणार आहे. आयफोन १५ मध्ये अनेक बदल दिसणार आहेत. भारताच्या नियमानुसार आयफोनमध्ये टाईप सी पोर्ट द्यावा लागणार आहे. आयफोन १५ घेणाऱ्यांना अॅपल कंपनी जबरदस्त धक्का देणार आहे. आयफोन १५ सिरीजच्या किंमती लीक झाल्या आहेत, त्या पाहता आयफोन प्रेमींना त्यांचा खिसा नाही तर खातेच रिकामे करावे लागण्याची शक्यता आहे.
तुम्हाला विश्वासही बसणार नाही परंतू, आयफोनच्या किंमती दोन लाखांच्या वर असणार आहेत. ज्या आयफोन १४ पेक्षा कितीतरी जास्त आहेत. आयफोन 15 च्या सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलंड फीचर दिले जाईल. तसेच, सर्व मॉडेल्समध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात येईल. यामध्ये iOS 17 अपडेटसह येऊ शकतो. लेटेस्ट A17 बायोनिक चिपसेट दिला जाऊ शकतो.
याशिवाय अॅक्शन बटण आणि पेरिस्कोपिक लेन्सचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. iPhone चे सर्वात महाग मॉडेल iPhone 15 Pro Max असेल. हे मॉडेल 1TB आणि 2TB स्टोरेजसह येईल. अमेरिकेत याची किंमत $ 1699 (1,40,547 रुपये) पासून सुरू होईल. परंतू, भारतात याच आयफोनसाठी सुमारे 50,000 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. यामुळे अंदाजानुसार भारतात आयफोन 15 च्या 1TB ची किंमत सुमारे 2 लाख रुपये असेल. तर 2TB मॉडेलची किंमत सुमारे 2 लाख 15 हजार रुपये असू शकते.
iPhone 15 Pro 128GB – $1099iPhone 15 Pro 256GB – $1,199iPhone 15 Pro 512GB – $1,299iPhone 15 Pro 1TB – $1,499iPhone 15 Pro 2TB – $1,699 iPhone 15 Pro Max 128 GB – $1,199iPhone 15 Pro Max 256 GB – $1,299iPhone 15 Pro Max 512 GB – $1,399iPhone 15 Pro Max 1TB – $1,599iPhone 15 Pro Max 2TB – $1,799