स्मार्टफोन चार्जिंगसंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्राझीलमधील कॅम्पिना ग्रँड येथे राहणाऱ्या जेनिफर कॅरोलिन नावाच्या 17 वर्षीय गर्भवती महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, या घटनेत जेनिफरच्या गर्भातील मूलाचाही मृत्यू झाला.
एका वृत्तानुसार, जेनिफरच्या पतीने सांगितले की, जेनिफर अंघोळ करून आली होती आणि तिने एक्सटेंशन कॉर्डच्या माध्यमाने फोन चार्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक शॉक लागून तिचा मृत्यू झाला. तिच्या पतीने रूममध्ये प्रवेश केला, तेव्हा ती जमीनीवर पडलेली होती. यानंतर, मोबाइल इमरजन्सी केअर सर्व्हिसची (एसएएमयू) टीम त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर, त्यांनी तिच्या मृत्यूची पुष्टी केली.
स्वतःला सुरक्षित ठेवणे अधिक आवश्यक - सध्या स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्याच आयुष्यात इतक अविभाज्य भाग बनला आहे. एवढा की अगदी बाथरूममध्येही आपल्याला फोन हवा असतो. मात्र ते किती धोकादायक ठरू शखते याचा अंदाज वरील उदाहरणावरून सहजपणे येऊ शकतो. यामुळे, ओल्या हातांनी कुठळ्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिकशी संबंधित काम करू नये. इलेक्ट्रिक काम करताना काळजी घ्यायला हवी. महत्वाचे म्हणजे, ओल्या हातांनी फोन वापरणे टाळायला हवे.