शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

दमदार फीचर्ससह येणाऱ्या One Plus 11 चं बुकिंग सुरु, १ लाखांच्या नव्या टीव्हीसह ५ जबरदस्त प्रोडक्ट्स लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 1:04 AM

उत्तम डिस्ल्पे आणि दमदार बॅटरीसह कंपनीनं आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन वन प्लस 11 लाँच केलाय. याशिवाय कंपनीनं आणखी एक स्वस्त स्मार्टफोनदेखील बाजारात आणलाय.

जयदीप दाभोळकरवनप्लसने अखेर आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोनस्मार्टफोन भारतात लाँच केला. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या क्लाऊड 11 मध्ये OnePlus 11 अधिकृतरित्या सादर केला आहे. Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर येणारा हा भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. 

Samsung Galaxy S22 सीरीजची किंमत 79,999 रुपयांपासून सुरू होते. तर दुसरीकडे iQOO 11 ची किंमत 59,999 रुपये आहे. वनप्लसने आपल्या या नव्या फ्लॅगशिप फोनच्या किंमतीचा खुलासा केला असून ती या दोन्ही स्मार्टफोनपेक्षा कमी ठेवण्यात आलीये. यासह कंपनीनं आपला OnePlus 11R देखील लाँच केलाय. OnePlus 11 पेक्षा या स्मार्टफोनची किंमत कमी आहे.

काय आहेत स्पेसिफिकेशन?वन प्लस 11 मध्ये 6.7-इंचाचा 2K सुपर फ्लुइड AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय. हा 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. या शिवाय या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आलाय. वन प्लस 11 मध्ये 256GB पर्यंत स्टोरेजचा पर्यायही उपलब्ध आहे. प्रीमिअम फीचर्ससह येणारा हा स्मार्टफोन अँड्रॉईड 13 बेस्ड ऑक्सिजन ओएस 13 वर काम करतो.

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आले असून याची मुख्य लेन्स 50MP आहे. याशिवाय 48MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32MP टेलिफोटो लेन्स देण्यात आलीये. फ्रन्टमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरीही देण्यात आलीये. ही 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किती आहे किंमत?OnePlus च्या या स्मार्टफोनच्या  8GB रॅम + 128GB व्हेरिअंटची किंमत 56,999 रुपये निश्चित करण्यात आलीये. तर त्याचा टॉप व्हेरिएंट 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येणाऱ्या व्हेरिअंटची किंमत 61,999 रुपये आहे. ॲमेझॉन आणि वन प्लसच्या वेबसाईटवर जाऊन हे स्मार्टफोन खरेदी करता येतील.

OnePlus 11R चे स्पेसिफिकेशन्स?OnePlus 11R आणि OnePlus 11 5G यांच्या लूकमध्ये फारसा फरक नाही. वन प्लस 11 आरमध्ये यामध्ये तुम्हाला 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. याशिवाय कंपनीनं 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्येही 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

OnePlus Pad लाँचवनप्लसने अखेर आपला पहिला टॅबलेट वनप्लस पॅड लाँच केला आहे. वनप्लस पॅड 5G कनेक्टिव्हिटीसह येतो. एप्रिल महिन्यापासून याच्या प्रीऑर्डरला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीनं दिली. भारताशिवाय हा टॅब नॉर्थ अमेरिका आणि युरोपमध्येही उपलब्ध होणार आहे. सध्या कंपनीने याची किंमत जाहीर केले नाही. OnePlus च्या नवीन टॅबमध्ये 11.61-इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय. टॅबमध्ये बिल्ट इन ट्रॅकपॅडसह एक डिटॅच होणारा फोलिओ देण्यात आलाय. या इव्हेंटमध्ये OnePlus ने आपल्या पहिल्या टॅबलेट व्यतिरिक्त OnePlus 11 5G, OnePlus 11R 5G, OnePlus Buds Pro, वन प्लस टीव्ही आणि वन प्लस कीबोर्डसारख्या उत्पादनांची घोषणा केली.

OnePlus Buds Pro 2 OnePlus ने Dynaudio च्या सहकार्याने नवीन इयरबड्सदेखील लाँच केले आहेत. नवीन इयरबड्समध्ये आर्बर ग्रीन, ऑब्सिडियन ब्लॅक आणि मिस्टी व्हाईट रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असतील. त्याची किंमत 11,999 रुपये आहे, तर भारतीय बाजारासाठी विशेष 2R व्हर्जन लाँच करण्यात आले असून याची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आलीये.

OnePlus TV 65 Q2 Proइव्हेंटदरम्यान OnePlus चा नवीन स्मार्ट टीव्ही लाँच करण्यात आला असून याची किंमत 99,999 रुपये निश्चित करण्यात आलीये. 65-इंचाच्या QLED 4K स्मार्ट टीव्हीमध्ये ब्ल्यू एलईडी बॅकलाईटसह फ्लॅगशिप लेव्हलचे QLED पॅनल देण्यात आलेय. यात 97 टक्के DCI-P3 सारखे फीचर्स असतील. याशिवाय, यात 120Hz रिफ्रेश रेट आणि टॉप-शेल्फ हार्डवेअरचा सपोर्ट मिळेल. OnePlus चा हा नवा स्मार्ट टीव्ही Google TV वर चालेल आणि त्याची प्री-बुकिंग 6 मार्चपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनTelevisionटेलिव्हिजन