शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

वन प्लस 6 रेड एडिशन बाजारपेठेत दाखल

By शेखर पाटील | Published: July 16, 2018 12:38 PM

वन प्लस कंपनीने आपल्या वनप्लस ६ या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनची रेड एडिशन आजपासून भारतीय ग्राहकांना सादर केली आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती.

वन प्लस कंपनीने आपल्या वनप्लस ६ या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनची रेड एडिशन आजपासून भारतीय ग्राहकांना सादर केली आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. वन प्लस ६ स्मार्टफोनची रेड एडिशन काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. अर्थात मिडनाईट ब्लॅक, मिरर ब्लॅक, सिल्क व्हाईट आदींसोबत लाल रंगाच्या पर्यायातही हे मॉडेल मिळणार आहे. मध्यंतरी अ‍ॅव्हेंजर्स लिमिटेड एडिशन जाहीर करण्यात आली असली तरी काही दिवसांमध्येच याला बंद करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमिवर वनप्लस ६ मॉडेलची रेड एडिशन फक्त ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोअरेजसाठी जाहीर झाले होते. आजपासून हे मॉडेल ग्राहकांना ३९,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. याला अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलसह वनप्लस कंपनीच्या स्टोअरवरून खरेदी करता येणार आहे.

वन प्लस ६च्या रेड एडिशनमध्ये ६.२८ इंच आकारमानाचा, फुल एचडी प्लस  (२२८० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा, १९:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले दिलेला आहे. यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण दिलेले आहे. यामध्ये अ‍ॅल्युमिनियमची मजबूत बॉडी प्रदान करण्यात आली असून याच्या मागील बाजूस ग्लासयुक्त कव्हर देण्यात आलेले आहे. वनप्लस ६ या स्मार्टफोनमध्ये अतिशय गतीमान असा क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅगड्रॅगन ८४५ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. वर नमूद केल्यानुसार याची रॅम ८ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून याला वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनच्या बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. हा कॅमेरा सेटअप व्हर्टीकल म्हणजे उभ्या आकारात आहे. यामध्ये १६ आणि २० मेगापिक्सल्सच्या दोन कॅमर्‍यांचा समावेश आहे. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. यात २-एक्स इतक्या क्षमतेच्या झूमची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात २० मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा असेल. आयफोन एक्स या मॉडेलप्रमाणे यात नॉचयुक्त डिझाईन देण्यात आलेले आहे. याच्या भागात फ्रंट कॅमेरा, प्रॉक्झिमिटी सेन्सर, इयरपीस आणि नोटिफिकेशन एलईडी देण्यात आलेले आहेत.  

वन प्लस सिक्सच्या रेड एडिशनमध्ये डॅश चार्ज या जलद गतीने चार्जींग करण्याच्या तंत्रज्ञानाने युक्त असणारी ३,३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी युएसबी टाईप-सी पोर्टच्या मदतीने चार्ज करता येणार आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ८.१ ओरियो या आवृत्तीवर चालणारे असून यावर ऑक्सीजन ओएस ५.१.२ हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल