लवकरच भारतीय बाजारात OnePlus 9RT पदार्पण करणार आहे. पुढील महिन्यात हा फोन देशात सादर केला जाऊ शकतो. परंतु जागतिक बाजारात कंपनी वनप्लस 10 सीरीजवर काम करत आहे. ही कंपनीची आगामी फ्लॅगशिप सीरिज आहे, जी सर्वप्रथम चीनमध्ये आणि त्यानंतर जगभरात सादर केली जाईल. काही दिवसांपूर्वी या सीरिजमधील OnePlus 10 Pro चे रेंडर्स समोर आले होते, त्यामुळे या फोनच्या डिजाईनची माहिती मिळाली. तर आता 91mobiles ने OnePlus 10 Pro चे फुल स्पेसिफिकेशन्स लीक केले आहेत.
OnePlus 10 Pro चे लीक स्पेसिफिकेशन्स
OnePlus 10 Pro मध्ये 6.7-इंचाचा QHD+ डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले वेगवान 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येईल. या फोनला आगामी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन1 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात येईल. त्याचबरोबर वेगवान LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज मिळेल. या फोनचे 12GB/256GB आणि 12GB/256GB असे दोन व्हेरिएंट उपलब्ध होतील.
फोटोग्राफीसाठी वनप्लस 10 प्रो मध्ये ट्रिपल कॅमेरा रियर सेटअप मिळेल. या सेटअपमध्ये 48MP चा प्रायमरी सेन्सर, 50MP ची अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 3.3x झूमसह 8MP चा टेलीफोटो लेन्स असेल. हा फोन 32MP च्या सेल्फी शुटरसह सादर केला जाऊ शकतो. फ्लॅगशिप सीरिजमध्ये पहिल्यांदाच कंपनी 5000mAh च्या मोठ्या बॅटरीचा वापर करू शकते, या बॅटरीच्या फास्ट चार्जिंगची माहिती मात्र मिळाली नाही. तसेच हा फोन IP68 वॉटर रेजिस्टन्स रेटिंगसह सादर केला जाईल. होगी.