OnePlus 10 Pro स्मार्टफोन मोठ्या दिमाखात कंपनीनं चीनमध्ये सादर केला होता. हा कंपनीचा सर्वात पावरफुल आणि महागडा स्मार्टफोन आहे. लवकरच भारतासह जागतिक बाजारात OnePlus 10 Pro एंट्री घेणार आहे. परंतु आता समोर आलेला व्हिडीओ अनेकांना स्मार्टफोनपासून दूर ठेऊ शकतो. कारण वनप्लसचा फ्लॅगशिप OnePlus 10 Pro स्मार्टफोन बेंड टेस्टमध्ये नापास झाला आहे.
OnePlus 10 Pro Bend Test
लोकप्रिय युट्युबर जॅक नेल्सन अर्थात JerryRIgEverything नं OnePlus 10 Pro स्मार्टफोनची बेंड टेस्ट केली आहे. थोडा प्रेशर देताच हा स्मार्टफोन बेंड होऊ लागला, असं युट्युब व्हिडीओमध्ये दिसत आहे. जॅकनं प्रीमियम वनप्लसवर अजून थोडा दबाव टाकताच या फोनचे दोन तुकडे झाले. विशेष म्हणजे वनप्लसचा प्रीमिमय स्मार्टफोन Corning Gorilla Glass Victus डिस्प्ले प्रोटेक्शनसह सादर करण्यात आला आहे. फोनच्या मागे देखील फॉरेस्टेड ग्लास बॅक देण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये बेंड टेस्ट सोबत अन्य टेस्ट देखील करण्यात आल्या आहेत.
Video:
OnePlus 10 Pro India Launch
मीडिया रिपोर्टनुसार, वनप्लस 10 प्रो स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येईल. रिपोर्टमध्ये 15 किंवा 16 मार्चला हा फोन लाँच होईल असं सांगण्यात आलं आहे. तसेच याची विक्री अॅमेझॉनच्या ‘होळी सेल’ मध्ये केली जाईल. लवकरच या फोनची अधिकृत घोषणा देखील OnePlus कडून समोर येऊ शकते.
हे देखील वाचा: