OnePlus 10 Pro च्या भारतीय लाँचची माहिती स्वतः कंपनीनं दिली आहे. येत्या 31 मार्चला भारतात हा फोन पदार्पण करणार आहे. हा फ्लॅगशिप डिवाइस याआधी चीनमध्ये लाँच झाला आहे, त्यामुळे याचे स्पेसिफिकेशन्स सहज उपलब्ध झाले आहेत. परंतु OnePlus 10 Pro ची भारतीय किंमत किती असेल याची माहिती मात्र समजली नाही. आता टिप्सटर अभिषेक यादवनं OnePlus 10 Pro च्या भारतातील किंमत आणि पहिल्या सेलची तारीख लीक केली आहे.
OnePlus 10 Pro Price In India
लीकनुसार OnePlus 10 Pro चे दोन व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला येतील. यातील बेस व्हेरिएंटची किंमत 66,999 रुपये असू शकते. तर टॉप एन्ड व्हेरिएंटसाठी 71,999 रुपये मोजावे लागतील. भारतात हा डिवाइस 5 एप्रिलला पहिल्यांदा विक्रीसाठी येईल, अशी माहिती टिपस्टर अभिषेक यादवनं दिली आहे.
OnePlus 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स
वनप्लस 10 प्रो चे सर्वच स्पेक्स दर्जेदार आहेत. याची सुरुवात 6.7 इंचाच्या 2के फ्ल्यूड अॅमोलेड एलटीपीओ 2.0 डिस्प्लेपासून होते. पंच-होल डिजाईन असलेला हा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश आणि 480हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शनसह यात एचडीआर10+ आणि एमईएमसी सारखे फीचर्स मिळतात.
हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर देण्यात आला आहे. यात 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी या फ्लॅगशिप किलरमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80W वायर्ड फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजीला देखील सपोर्ट करते.
वनप्लस 10 प्रो लेटेस्ट अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 12GB वेगवान LPDDR5 RAM आणि 256GB लेटेस्ट UFS 3.1 storage देण्यात आली आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंट देण्यात आला आहे.