OnePlus 10 Pro स्मार्टफोनची प्री बुकिंग चीनमध्ये सुरु झाली आहे. हा फोन येत्या 4 जानेवारीला लाँच केला जाईल. वनप्लस 10 प्रो स्मार्टफोन सोबत कंपनीनं वॅनिला OnePlus 10 देखील बाजारात घेऊन येईल. वनप्लस 10 प्रो मधील LTPO 2.0 डिस्प्ले, Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 12GB RAM आणि 80W फास्ट चार्जिंग हे फिचर कन्फर्म झाले आहेत.
सोमवारपासून OnePlus 10 Pro स्मार्टफोनचं प्री-रजिस्ट्रेशन सुरु झालं आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि JD.com वरून प्री बुक करता येईल. तसेच Oppo च्या चीनी वेबसाईटनुसार हा फोन 4 जानेवारीला लाँच केला जाईल. परंतु हे फक्त एक लीक आहे त्यामुळे जोपर्यंत वनप्लसकडून घोषणा केली जात नाही तोपर्यंत फोनच्या लाँच डेटवर विश्वास ठेवता येणार नाही.
OnePlus 10 Pro चे संभाव्य स्पेक्स
वनप्लसनं वनप्लस 10 प्रो फोनमधील Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरची माहिती दिली आहे. तसेच फोनमध्ये LTPO 2.0 डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन 6.7 इंचाच्या QHD+ अॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात येईल. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. डिवाइसमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB इंटरनल UFS 3.1 स्टोरेज मिळू शकते. फोनमधील 5000mAh ची बॅटरी 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. वनप्लस 10 प्रो 1,069 डॉलर्स (जवळपास 80,200 रुपये) मध्ये लाँच केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा:
कॉल, चार्जिंग करताना स्मार्टफोन गरम होतो का? या टिप्स ठेवतील तुमचा फोन कूल
खुशखबर! iPhone स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी; Apple प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट