OnePlus सध्या भारतात आपल्या स्मार्टफोन्समध्ये होत असलेल्या स्फोटांमुळे चर्चेत आहे. कंपनीच्या नॉर्ड सीरिजचे अनेक स्मार्टफोन देशात ब्लास्ट झाले आहेत. तर तिकडे चीनमध्ये कंपनीनं आपला नवीन फ्लॅगशिप कीलर सादर केला आहे. बहुप्रतीक्षित पॉवरफुल OnePlus 10 Pro स्मार्टफोन 12GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 32MP Selfie Camera आणि 80W fast charging सह लाँच करण्यात आला आहे. लवकरच हा फोन भारतात देखील दाखल होईल.
OnePlus 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स
वनप्लस 10 प्रो चे सर्वच स्पेक्स दर्जेदार आहेत. याची सुरुवात 6.7 इंचाच्या 2के फ्ल्यूड अॅमोलेड एलटीपीओ 2.0 डिस्प्लेपासून होते. पंच-होल डिजाईन असलेला हा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश आणि 480हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शनसह यात एचडीआर10+ आणि एमईएमसी सारखे फीचर्स मिळतात.
वनप्लस 10 प्रो लेटेस्ट अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 12GB वेगवान LPDDR5 RAM आणि 256GB लेटेस्ट UFS 3.1 storage देण्यात आली आहे.
हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर देण्यात आला आहे. यात 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी या फ्लॅगशिप किलरमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80W वायर्ड फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजीला देखील सपोर्ट करते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंट देण्यात आला आहे.
OnePlus 10 Pro ची किंमत
- OnePlus 10 Pro 8GB/128GB: 4699 युआन (सुमारे 54,500 रुपये)
- OnePlus 10 Pro 8GB/256GB: 4999 युआन (सुमारे 58,000 रुपये)
- OnePlus 10 Pro 12GB/256GB: 5299 युआन (सुमारे 61,500 रुपये)
हे देखील वाचा:
512GB स्टोरेजसह आला जगातील सर्वात ‘पातळ' Foldable Phone; सॅमसंग-शाओमी नाही तर या कंपनीनं केली कमाल
Flipkart Sale: 28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर