OnePlus 10 Pro अखेरीस अधिकृतपणे प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. या लिस्टिंगमधून फोनचे फोटो, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स समोर आले आहेत. या लिस्टिंगनुसार हा 8GB RAM + 128GB, 8GB RAM + 512GB आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज असे तीन व्हेरिएंट सादर केले जातील. तसेच हा फोन ब्लॅक आणि ग्रीन कलरमध्ये विकत घेता येईल. आता प्री-बुकिंगसाठी आलेला हा फोन 11 जानेवारीला चीनमध्ये लाँच केला जाईल.
OnePlus 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स
लिस्टिंगनुसार, OnePlus 10 Pro मध्ये 6.7 इंचाचा कर्व्ड स्क्रीन डिस्प्ले मिळेल, जो स्लिम बेजल्स आणि 120Hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाईल. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार हा Samsung LTPO 2.0 डिस्प्ले असेल. या वनप्लसमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट असेल, सोबत LPDDR5 RAM आणि UFS 3.1 इंटरनल स्टोरेजसह येईल. चीनमध्ये अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12 तर जागतिक बाजारात ऑक्सिजन ओएस मिळेल.
फोटोग्राफीसाठी आगामी वनप्लसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 50MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 8MP चा थर्ड सेन्सर 3x ऑप्टिकल झूमसह देण्यात येईल. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. तसेच या फोनमध्ये 5,000mAh battery आणि 125W fast charging सपोर्ट मिळू शकतो.