OnePlus होम मार्केट चीनमध्ये OnePlus 10 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोन पुढील महिन्यात सादर करणार आहे. हा कंपनीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल. चीननंतर भारतासह जगभरातील वनप्लस चाहत्यांना या फोनचा अनुभव घेता येईल. आता लाँच पूर्वीच या दमदार फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा 3C सर्टिफिकेशन वेबसाईटवरून झाला आहे.
OnePlus 10 Pro ची 3C लिस्टिंग सर्वप्रथम MySmartPrice नं स्पॉट केली आहे. या वेबसाईटवर हा फोन NE2210 या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. तसेच लिस्टिंगमध्ये 80W सुपर फास्ट चार्जची माहिती देण्यात आली आहे. याआधी आलेल्या रिपोर्ट्समध्ये यातील 5,000mAh च्या बॅटरीचा उल्लेख करण्यात आला होता. एवढी मोठी बॅटरी असलेला हा कंपनीचा पहिलाच फ्लॅगशिप स्मार्टफोन असू शकतो. तसेच 80W सुपर फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टमुळे हा फोन आणखीनच आकर्षक वाटतो.
OnePlus 10 Pro चे संभाव्य स्पेक्स
वनप्लसनं वनप्लस 10 प्रो फोनमधील Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरची माहिती दिली आहे. तसेच फोनमध्ये LTPO 2.0 डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन 6.7 इंचाच्या QHD+ अॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात येईल. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. डिवाइसमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 512GB इंटरनल UFS 3.1 स्टोरेज मिळू शकते. फोनमधील 5000mAh ची बॅटरी 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. वनप्लस 10 प्रो 1,069 डॉलर्स (जवळपास 80,200 रुपये) मध्ये लाँच केला जाऊ शकतो.
हा फोन Android 12 आधारित ColorOS (चीनमध्ये) आणि OxygenOS (जगभरात) सादर केला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यात 48MP Hasselblad-ब्रँडचा सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचे काम करेल. तसेच 50MP अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 8MP टेलीफोटो लेन्स असेल जी 3X ऑप्टिकल झूमला सपोर्ट करेल. फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
हे देखील वाचा:
Jio युजर्सनी इकडे लक्ष द्या! या 7 चुका तुम्हाला करू शकतात 'कंगाल', आताही वेळ आहे
शेवटचा दिवस! फक्त 975 रुपयांमध्ये iPhone विकत घेण्याची संधी, फ्लिपकार्ट देतंय तगडा डिस्काउंट